HOME   लातूर न्यूज

३१ तारखेला मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा लातुरात

लातूर जिल्ह्यात अनेक मतदारसंघात जाहीर आणि स्वागत सभांचे आयोजन


३१ तारखेला मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा लातुरात

लातूर: भाजपा महायुतीने मागच्या ०५ वर्षात राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेले लोकहिताचे निर्णय व केलेल्या विकास कामांची माहिती देवून आगामी निवडणुकीसाठी जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात महाजनादेश यात्रा काढली आहे. या यात्रेचा दुसरा टप्पा चालू असून या टप्प्यात ही यात्रा ३१ ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होणार असून या सभांना जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
३१ ऑगस्ट रोजी दुपारी ०२ वाजता अहमदपूर येथील निजवंते नगर मैदान येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली असून यानंतर ०२.३० वाजता शिरूर ताजबंद येथे तर दुपारी ०३.०० वाजता हाळी हंडरगुळी येथे या यात्रेचे स्वागत होणार आहे. दुपारी ०३.३० वाजता वाढवणा पाटी या यात्रेचे स्वागत झाल्यानंतर उदगीर येथे दुपारी ०४.३० वाजता जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. उदगीर येथून ही यात्रा निघाल्यानंतर सायंकाळी ०५.३० वाजता लोहारा तर सायंकाळी ०५.४५ येरोळ मोड तसेच सायंकाळी ०६ वाजता तळेगाव रोड व ०६.१५ वाजता आष्टामोड येथे या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ०६.३० वाजता ममदापुर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या यात्रेचे स्वागत केल्यानंतर सायंकाळी ०७ वाजता लातूर येथील टाऊन हॉलच्या मैदानावर महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस जनतेशी जाहीर सभेद्वारे संवाद साधणार आहेत.
३१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा लातूर येथेच मुक्काम असणार असून ०१ सप्टेंबर रोजी सकाळी ०९.३० वाजता मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. यानंतर सदर यात्रा बाभळगाव, पानचिंचोली मार्गे, तुपडी मार्गे, निलंगा येथे पोहचणार असून तेथे दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन मार्केट यार्ड मैदानावर करण्यात आले आहे. निलंगा येथून ही यात्रा लामजाना पाटी मार्गे औसा येथे दुपारी ०२ वाजता पोहचणार आहे. औसा येथील एसटी डेपोच्या मैदानावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर शिवली मार्गे सदर यात्रा उस्मानाबाद जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आयोजित केलेल्या जाहीर सभांना व स्वागत सभांना जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून आशिर्वाद द्यावा असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे.


Comments

Top