HOME   लातूर न्यूज

भाजपात धनदांडगे-गुंडांना तिकिटे, निष्ठावंतांना डावलले

आचारसंहितेपूर्वी न्याय द्यावा, लातुरच्या निष्ठावंतांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


भाजपात धनदांडगे-गुंडांना तिकिटे, निष्ठावंतांना डावलले

लातूर: भाजपातील जुन्या निष्ठावंतांच्या मनातील राग आता बाहेर पडू लागला आहे. या कार्यकर्त्यांनी आपणावर झालेला अन्याय स्पष्ट करीत आचारसंहितेपूर्वी न्याय द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जनसंघ ते भाजपा स्थापनेपासून ज्यांनी उभी हयात पक्षकामी खर्ची घातली, तत्कालीन कठीण परिस्थितीत मानापमान, अवहेलना सहन केल्या. आज पक्ष सत्तेत आहे, रहावा. पण ०५ वर्षात आम्हाला किती न्याय मिळाला? मनपा, विधानसभा, लोकसभएची तिकिटे कुणाला दिली? विविध कमिट्यांवर कोणाच्या नियुक्त्या केल्या? नव्याने आलेले धनदांडगे, गुंडांना तिकिटे दिली गेली. मूळ कार्यकर्त्यांना डावलले गेले हे अन्यायकारक आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी न्याय द्यावा, वेळोवेळी पक्षाचे कार्यक्रम कळवावेत, कार्यक्रमात सहभागी करुन घ्यावे असेही निवेदनात म्हटले आहे. यावर प्रकाश सोनवणे, किशोर जैन, वसंत मदने, रामेश्वर भराडिया, माधवराव पाटील टाकळीकर, चंद्रशेखर क्षिरसागर, गुंडप्पा कावळे, महादेव कातळे, सोपान मंडाळे, दिलीप पांडे, जितेश चापसी, सुरेश जैन, जमीलनाना शेख, रमाकांत बानाटे, प्रा. गिरजाप्पा मुचाटे, डॉ. बाबासाहेब घुले, शरद कोरे, अशोक शिंदे, महादेव वाघमारे, कमलाकर जाधव, राजकुमार सूर्यवंशी, भिमा जाधव, गुरुनाथ झुंजारे, संजय अग्रवाल यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


Comments

Top