HOME   लातूर न्यूज

अभिमन्यू पवार यांनी मागितली औशातून उमेदवारी

औशाच्या विकासासाठी मागील दोन वर्षांपासून मेहनत


अभिमन्यू पवार यांनी मागितली औशातून उमेदवारी

लातूर: विकासापासून कोसोदूर असलेल्या औसा मतदारसंघात मागील दोन वर्षांपासून विकासनिधी आणून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असलेले मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक तथा औशाचे भूमिपुत्र अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढविण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे मुलाखत देवून उमेदवारीची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार हे औशाच्या विकासासाठी मागील दोन वर्षांपासून मेहनत घेत आहेत. मतदारसंघातील विविध विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत. मतदारसंघातील बहुतेक सर्वच गावांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून शासनाचा निधी देवून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यांच्या विकासकामांच्या झपाट्याने अल्पावधीतच ते जनतेला सुपरिचित झाले आहेत. मतदारसंघासोबतच जिल्ह्यातील कठीणात कठीण प्रश्‍न चुटकीसरशी सोडविण्याची त्यांची ख्याती आहे. यातूनच मागील अनेक वर्षांपासून औसेकरांची मागणी असलेली माकणीच्या पाण्याची मागणी होताच पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अवघ्या चार दिवसांतच ती मंजूर करून घेतली. यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांची तरतूद करून प्रशासकीय मान्यताही मिळविली आहे. लवकरच या कामाला सुरुवातही होणार आहे. त्याचबरोबर पवार यांनी मतदारसंघातील औसा, कासार शिरसी, लामजना आदी ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानकांच्या कामांना मंजुरी मिळवून घेतली आहे. ३० खेडी व १० खेडी पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी निधीची तरतूद केली आहे. अशी अनेक विकासकामे पवार यांनी मागील ०२ वर्षांतच पूर्ण केली आहेत. यामुळे त्यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क निर्माण झाला आहे. पवार यांनी औशातूनच निवडणूक लढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. यामुळे आज (शुक्रवारी) भाजप इच्छुकांच्या मुलाखतीसाठी आलेल्या राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत अभिमन्यू पवार यांनी औशातून लढण्याची इच्छा व्यक्त करीत मुलाखत दिली.


Comments

Top