HOME   लातूर न्यूज

निलंग्यातून एकट्या संभाजीरावांकडून उमेदवारीची मागणी

सहा जागांसाठी भाजपाकडे १११ जण उत्सुक, सर्वाधिक मागणी लातूर शहरमधून!


निलंग्यातून एकट्या संभाजीरावांकडून उमेदवारीची मागणी

लातूर: लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडे १११ जणांनी उमेदवारी मागणी केली आहे. पाणी पुरवठा मंत्री, भाजपाचे निरीक्षक बबनराव लोणीकर यांनी विश्रामगृहावर या सर्वांच्या मुलाखती घेतल्या. अनेक उत्सुक समर्थकांना घेऊन आल्याने विश्रामगृहाला जत्रेचे रुप आले होते. निलंगा मतदारसंघातून फक्त पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उमेदवारी मागितली. या मतदारसंघात त्यांच्याशी कुणीही स्पर्धा केली नाही. उदगीर मतदारसंघातून २९ जण उत्सुक आहेत. विद्यमान सुधाकर भालेरावांसह अ‍ॅड. दिग्विजय काथवटे हा नवा चेहरा गर्दीत दिसला. लातूर शहर मतदारसंघात ३१ जणांमध्ये स्पर्धा दिसली. उदगीर खालोखाल लातूर ग्रामीण मतदारसंघात मोठी स्पर्धा आहे. २७ जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्यानंतर अहमदपूर मतदारसंघातून २२ जण उत्सुक आहेत. औसा मतदारसंघातून १२ जणांनी दावा केला आहे. यात अभिमन्यू पवार, अरविंद पाटील, मिलींद लातुरे, बजरंग जाधव, किरण उटगे, महेश पाटील, सुभाष जाधव, संतोष मुक्ता, सुनील उटगे, काकासाहेब मोरे यांचा समावेश आहे. लातूर ग्रामीणमधून उमेदवारी मागणार्‍यात रमेश कराड, ओमप्रकाश गोडभरले, विक्रम शिंदे, हणमंत नागटिळक, प्रकाश पाटील वांजरखेडकर, प्रदीप मोरे, बाबूराव खंदाडे, राजकुमार कलमे यांचा समावेश आहे. अहमदपूर मतदारसंघातून विनायकराव पाटील, गणेश हाके, भारत चामे, दिलीपराव देशमुख आदी २२ जणांनी उमेदवारी मागितली आहे.
लातूर शहर मतदारसंघातून शैलेश लाहोटी, सुरेश पवार, देवीदास काळे, नागनाथ निडवदे, अख्तर मिस्त्री, गुरुनाथ मगे, प्रेरणा होनराव, चंद्रकांत बिराजदार, रामचंद्र तिरुके, मन्मथ भातांब्रे, बाबूराव खंदाडे आदी ३१ जणांचा समावेश आहे.


Comments

Top