HOME   लातूर न्यूज

टिंबर मार्केट मधील व्यापाऱ्यांची आमदारांनी घेतली भेट

मंदी, वीज दर, मनपाचे कर आदी अनेक अडचणींवर केली चर्चा


टिंबर मार्केट मधील व्यापाऱ्यांची आमदारांनी घेतली भेट

लातूर: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी जनसंपर्क अभियानांतर्गत लातूर शहरातील बाभळगाव रस्त्यावरील लातूर एकता फर्निचर अँड सॉ मिल संघ कार्यालय या ठिकाणी लातुरातील लाकूड व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. लातूर मनपा कडून करण्यात आलेली अधिकची भाडेवाढ, लाकूड व फर्निचर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना लावलेला कर, महावितरण कडून व्यावसायिक वीज वापरा पोटी आकारले जाणारे विजेचे दर, सध्याची बाजारपेठेतील मंदी या सह विविध विषयावर यावेळी चर्चा पार केली. यावेळी ॲड. फारुख शेख, दिलीप आरदवाड, अहेमद खान पठाण, विजयकुमार साबदे, भिमजी पटेल, शामजी पटेल, मिमिन निसार, विष्णु साबदे, अमिर शेख, खय्युम मिस्त्री, शेख दस्तगीर, शेख जमिल मिस्त्री, मैनोद्दिन शेख, यांच्यासह लातूर मधील टिंबर व्यापारी उपस्थित होते.


Comments

Top