HOME   लातूर न्यूज

सत्ता द्या, एक महिन्यात उजनीचे पाणी देऊ

आ. अमित देशमुख यांची बैठक, स्क्रॅप मार्केट व्यापार्‍यांशी साधला संवाद


सत्ता द्या, एक महिन्यात उजनीचे पाणी देऊ

लातूर: लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी २१ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र सत्ताधारी मराठवाड्याला हक्काचे २१ टीएमसी पाणी देऊ शकले नाहीत. जनतेने राज्यात काँग्रेस सरकार आणल्यास पहिल्याच महिन्यात लातूरला उजनीचे पाणी आणण्याचे काम केले जाईल, जनतेने या विदयमान सत्ताधाऱ्यांना गल्ली पासून दिल्ली पर्यंत एकहाती सत्ता दिली. मात्र सत्ताधाऱ्यांना पाच वर्षात जनतेला साधे पिण्याचे पाणी देता आले नाही, ही एक शोकांतिका असल्याचे मत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले, ते लातूर शहरातील स्क्रॅप मार्केट या ठिकाणी जनसंपर्क अभियाना अंतर्गत आयोजित संवाद बैठकीत बोलत होते. आमदार अमित देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर लातूर शहर विधानसभा मतदार संघात जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत शहरातील स्क्रॅप मार्केट भागात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलतांना लातूरच्या जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी अफवा पसरवून बदनामी करणे, जनतेच्या मनात संशय निर्माण करणे अशा गोष्टी घडत आहेत. यावर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले.
स्क्रॅप मार्केट विस्तार करणार
काही लोक लातुरात असलेल्या मोकळ्या जागेवर सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून कब्जा करीतम आहेत. यामुळे छोटे व्यवसायीक, व्यापारी व सामान्य माणसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सार्वजनीक आणि शासकीस जागेवर अतीक्रमण करणारे असे अनेक कब्जेदार लातूरात तयार झाले आहेत. पण त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत यासाठी तुमचा स्थानिक आमदार रखवालदार म्हणून तुमच्या करीता सक्षम आहे. लातूरच्या जनतेच्या मालमत्तेकडे वाकडी नजर करणाऱ्याचा बंदोबस्त कसा करायचा याचे बाळकडू आम्हाला मिळाले आहे. स्क्रॅप मार्केट शेजारील डालडा फॅक्टरीची काही लोकांनी कब्जा केलेली सरकारी मोकळी जागा परत घेतल्याचे सांगून या जागेचा वापर स्क्रॅप मार्केट मधील व्यावसाय व व्यापार वाढून सामान्याची सोय व्हावी अशा पध्दतीने केला जाईल. या सर्व कामासाठी पुढाकार घेऊन आराखडा तयार करण्याची गरज आहे असे त्यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी स्क्रॅप मार्केट असोसिएशन अध्यक्ष सलीम उस्ताद, विक्रांत गोजमगुंडे, अॅड. किरण जाधव, रामभाऊ कोंबडे, शशी अकनगिरे, संजय ओव्हळ, मुख्तार शेख, शेख मुस्तफा, जाकिर शेख, युसुफ शेख यांच्यासह स्क्रॅप मार्केट मधील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top