HOME   लातूर न्यूज

विविध प्रश्नी आज लातूर बंद

लातूरकर या नात्याने माझाही पाठिंबा- आ. अमित देशमुख


विविध प्रश्नी आज लातूर बंद

लातूर: लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, सदोष मीटर बसवुन ग्राहकांना दिलेली वाढीव वीजबीले वीज वितरण कंपनीने रद्द करावीत, लातूर महानगरपालिकेने वाढविलेल्या मालमत्ता कर व भाडेवाढ रद्द करावी यासह नागरी हक्क कृती समिती, विविध राजकीय पक्ष व व्यापारी महासंघ तसेच सामाजीक संघटनांनी एकत्र येऊन पुकारलेल्या १३ सप्टेंबर रोजीच्या लातूर बंदला माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.
लातूरकरांच्या महत्वाच्या प्रश्नावर नागरी हक्क कृती समिती, विविध राजकीय पक्ष व व्यापारी महासंघ तसेच सामाजीक संघटनांनी बंद १३ सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. त्याला आपण लोकप्रतिनिधी या नात्याने पाठीबा देत आहे अशा आशयाचे पत्र आमदार देशमुख यांनी बंदसाठी पुढाकार घेतलेल्या कृती समितीला दिले आहे. केवळ घोषणाबाजी करणार्‍­या केंद्र आणि राज्यातल्या शासनाने मागच्या पाच वर्षात कोणत्याही आश्वासनाची पुर्तता केलेली नाही. जनतेच्या मुलभूत समस्यांकडेही या शासनाने दुर्लक्ष केलेले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मंडळींच्या हातात सत्ता असूनही जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांना वेठीस धरण्याचे काम सत्ताधारी मंडळींकडून होत आहे. लातूर व परिसरात सलग दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना कोणत्याही उपाययोजना शासनाने आखलेल्या नाहीत. सन २०१६ पासून लातूर येथे येऊन मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंळहाची बैठक घेतली. उजनी धरणातून लातूरला पाणी आणण्याची घोषणा केली. मात्र शासनाच्या इतर घोषणांप्रमाणे ही घोषणाही हवेतच विरली आहे. तसेच सदोष मीटर बसविल्यामुळे वीज बिलामध्ये दीड ते दोनपट वाढ झाली आहे. हे मीटर बदलून वीज बील माफ करावे व सदोष मीटर बसविणा­यांवर गुन्हे दाखल करावेत. लातूर जिल्ह्रात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत दुष्काळी उपाययोजना आखणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे गरजेचे आहे. नोटबंदी, जाचक जीएसटी यामुळे व्यापा­यांचे व्यवसाय ठप्प झालेले असताना महापालिकेने व्यापारी गाळ्यांची भाडेवाढ केलेली आहे. ही अन्यायकारक असलेली भाडेवाढ रद्द होणे गरजेचे आहे. या मागण्या रास्त असून त्या मंजूर करण्यात याव्यात. या मागणीसाठी ‘आम्ही लातूरकर’ या नावाखाली सर्व लातूरकर एकत्र आले असून सर्वांच्या वतीने १३ सप्टेंबर २०१९ रोजी लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. लातूरकर या नात्याने माझाही या बंदला जाहीर पाठींबा असून सर्व जनेतेनेही या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व लातूर बंदला पाठींबा द्यावा असे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले आहे.


Comments

Top