HOME   लातूर न्यूज

पाण्या अभावी विसर्जन झाले नाही!

देशातली पहिली घटना, ०५ वर्षात सरकारने पाण्यासाठी काय केले?


पाण्या अभावी विसर्जन झाले नाही!

लातूर: भारतीय पंरपरेतील अत्यंत महत्वाचा उत्सव म्हणून गणेशउत्सव साजरा केला जातो. दुष्काळ काँग्रेसच्या काळातही होता पण लातूरला पाणी कमी पडू दिले नाही. सत्ताधारी सरकारने पाणी नसल्याने लातूरला गणपती दान करा असे बोलणे म्हणजे पाच वर्षात पाण्यासाठी काहीच केले नाही याची अप्रत्यक्ष कबुलीच आहे. पाण्याअभावी लातूरात गणेश विसर्जन झाले नाही ही देशातील पहिली घटना म्हणून इतिहासात नोंद झाली आहे, अशी टीका आमदार अमित देशमुख यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क अभियानाला सुरूवात केली असून या अभियांनाअतंर्गत सिकंदरपूर, चांडेश्वर येथील विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. सिकंदरपूर येथे मागील पाच वर्षात स्थनिक आमदार निधीयून केलेल्या कामांची, वचनपुर्तीची माहिती व मुस्लीम समाजाच्या दफनभुमीसाठी संरक्षक भिंत बांधकाम, शाळा दुरूस्ती, सिमेंट काँक्रीट नालीचे उदघाटन व मौजे चांडेश्वर येथील पाणी शुद्धीकरण केंद्र, मशिदीसमोरील पेवर ब्लॉक कामाचा शुभांरभ तसेच विविध विकास कामाचे लोकार्पण व शुभांरभ आमदार अमित देशमुख यांनी केला.
यावेळी पुढे बोलतांना आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो म्हणणारे बेरोजगारी वाढवत आहेत. जीएसटी, नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने प्रश्नमार्गी लावणारे काँग्रेसचे सरकार निवडावे उलट प्रश्न निर्माण करणार्‍या युती सरकारला धडा शिकवावा.
यावेळी दगडुसाहेब पडीले, राजेसाहेब सवई, शितल फुटाणे, दत्ता शिंदे, सुपर्ण जगताप, मोहन सुरवसे, प्रविण सुर्यवंशी, शरद देशमुख, गोविंद बोराडे, सुभाष जाधव, प्रताप पाटील तर सिंकदरपुर येथील उपसरपंच शिवाजी देशमुख, माधव गंभिरे, व्यंकटराव देशमुख, काकासाहेब गंभिरे, नाना पाटील, दिलीप गंभीरे, बालाजी पवार, डॉ. संदीप क्षिरसागर, केशव गंभिरे, उध्दव पाटील, शामराव गंभिरे, रामभाऊ गंभिरे, प्रशांत ताटे, बालाजी देशमुख, श्रीपती सुरवसे, पुष्पराज पाटील व सिंकदरपुर ग्रामस्थ, चांडेश्वर येथील सरपंच शिवाजी गायकवाड, उपसरपंच जिवनराव गुंजरगे, दिगंबर पुरी, प्रसाद पुरी, विकास पुरी, सुबुद्यिन शेख, बाबा गायकवाड, खलिम शेख, चुन्नुमीयॉ पठाण, मौला शेख, जयहिंद पुरी, गफार शेख, प्रताप पाटील, बापुसाहेब सपाटे, शंभुराजे पवार, कासम शेख आदी उपस्थित होते.


Comments

Top