HOME   लातूर न्यूज

बेजबाबदार सत्ताधाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा

जनसंपर्क अभियानात आमदार अमित देशमुख यांचे आवाहन


बेजबाबदार सत्ताधाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा

लातूर: दैनंदिन जीवनामध्ये जनतेला असंख्य समस्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. मुलभूत प्रश्न दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करत असुन याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. नोटबंदी, जीएसटी, मालमता कर, वीजबिल यासारख्या अनेक सताधारी सरकारच्या चुकीच्या धोरणाने जनतेचे कंबरडे मोडले आहे, असा हल्लाबोल करीत आगामी विधानसभा निवडणुकीत बेजबाबदार सत्ताधाऱ्यांना जनतेने कायमचा धडा शिकवावा असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले.
विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर लातूर शहरात काँग्रेसचे जनसंर्पक अभियान सुरू असून लातूर शहर मतदारसंघातील मतदारांशी संवाद तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ या जनसंपर्क अभियाना अंर्तगत आमदार अमित देशमुख. यांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील प्रभाग १३ मधील सदाशिवनगर येथील हनुमान मंदीर सभागृहाचे भुमीपुजन, संभाजी नगर, खाडगाव रोड येथिल विश्वशांती बौध्द विहार सभागृहाचे लोकार्पण, प्रभाग २ मधील गवळी नगर येथील सतरा ठिकाणच्या हाईमास्ट व महाथेरो चंद्रमणी सामाजिक सभागृहाचे लोकार्पण यावेळी आमदार अमित देशमुख. यांच्या हस्ते करण्यात आले.
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मील स्मारक, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक आदी स्मारकांची कामे पूर्ण न करता भाजप सरकारने जनतेची दिशाभूल केली. लातूर शहरातील शाहु चौकातील राजर्षी शाहु महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यास विलंब होणार होता तर अगोदरचा पुतळा सत्ताधा-यांनी का काढला याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे असे आ. देशमुख म्हणाले. यावेळी सदाशिव नगर, संभाजी नगर भागातील विविध विकास काम शुभांरभ प्रसंगी भंते पय्यानंदजी, मोईज शेख, पृथ्वीराज शिरसाठ, दत्ता सोमवंशी, सुपर्ण जगताप, मोहन सुरवसे, प्रविण सुर्यवंशी, शरद देशमुख, आयुब मनियार,सचिन गंगावणे, धनंजय शेळके, शेषेराव कांबळे, यांची तर गवळी नगर येथील विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी समद पटेल, सचिन बंडापल्ले, गोपाळ सुर्यवंशी, चाँदपाशा ईनामदार, इम्रान सय्यद, उषाताई कांबळे, अनंत लांडगे, गणपत कदम, उषा भडीकर, विजयकुमार साबदे, हारूबाई बोईनवाड, राम गोरड, संतोष माने, रफिक सय्यद, दत्तात्रय कांबळे, संतोष बनसोडे, शंकुतला लांडगे, वर्षाताई कदम, सत्यवान कांबळे यांच्यासह काँग्रेस पक्ष पदाधिकारी, सदस्य व परीसरातील नागरिक मोठया संख्यने उपस्थित होते.


Comments

Top