HOME   लातूर न्यूज

रमेशअप्पांच्या नेतृत्वात हजारोंचा भाजपात प्रवेश

लातूर ग्रामीण मतदार संघात भाजपाला मोठे समर्थन; तरुणांसह महिलांचा महाप्रवेश


रमेशअप्पांच्या नेतृत्वात हजारोंचा भाजपात प्रवेश

लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारकडून होत असलेल्या विकासाभिमुख कामामुळे आणि भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूर ग्रामीण मतदार संघातील जवळपास ४१ गावातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विविध पक्षातील प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, तंटामुक्तीचे अध्यक्ष अशा तब्बल ०१ हजार ५६२ कार्यकर्त्यांनी १५ सप्टेंबर रोजी लातूर येथे भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला. या प्रवेशात तरुणांसह महिलांची संख्या लक्षणीय होती. लातूर ग्रामीण मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर या प्रवेशाने मोठा धक्का बसला असून आठवडाभरातील या दुसऱ्या महाप्रवेशामुळे लातूर ग्रामीणमध्ये भाजपा मजबूत होत आहे.
राज्यातील कानाकोपऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज भाजपात प्रवेश करीत असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम कारभाराला प्रभावित होवून ग्रामीण भागातही विरोधी पक्षातील असंख्य कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात ग्रामीण मतदार संघातील लातूर तालुक्यातील गादवड, भोसा, सारसा, शिऊर, जोडजवळा, वांजरखेडा, तांदूळजा, भाडगाव, मळवटी, बोडका, भिसे वाघोली, गोंदेगाव, नागझरी, कासारजवळा, बोरगाव काळे, वाकडी, मुरुड, जेवळी, धनेगाव औसा तालुका भादा सर्कल मधिल अंदोरा, बऱ्हाणपूर , जायफड, लखनगाव, कोरंगळा, समदरगा, टेंभी, वरवडा, काळमाथा आणि रेणापूर तालुक्यतील खरोळा, यशवंतवाडी, दर्जीबोरगाव, हारवाडी, शेरा, बिटरगाव, डिगोळ तांडा, इंदरठाणा, चाडगाव, गोढाळा, जवळगा यासह अनेक गावा-गावातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसह इतर पक्षातील तरुणांसह महिलांनी, पुढाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी दिड हजाराहून अधिक संख्येनी येत्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करुन भाजपात जाहिर प्रवेश केला. या मेळाव्यास भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी, महिला तरुण हजारोच्या संख्येनी उपस्थित होते.
या मेळाव्यास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय क्षीरसागर, विधानसभा प्रमुख अनिल भिसे, लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, रेणापूर तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, जिप सदस्य सुरेश लहाने, उपसभापती अनंत चव्हाण, संगायोचे लातूर तालुकाध्यक्ष साहेबराव मुळे, रेणापूर तालुकाध्यक्ष्‍ श्रीकिसन जाधव, सुरज शिंदे, शाम वाघमारे, वसंत करमुडे, बन्शी भिसे, भैरवनाथ पिसाळ, कृउबा संचालक विष्णुदास मोहिते, गोविंद नरहरे, भागवत सोट, पद्माकर चिंचोलकर, सोमनाथ पावले, राजकिरण साठे, शरद दरेकर, महिला आघाडीच्या लता भोसले, ललिता कांबळे, वंदणा गायकवाड, पस सदस्या बायणाबाई साळवे, चंद्रकला इंगोले, सुधाकर गवळी, श्रीमंत नागरगोजे, नरसिंग येलगटे, प्रताप पाटील, श्रीकृष्ण पवार, विजय चव्हाण, कृष्णा मोटेगावकर, दत्ता सरवदे, विजय चव्हाण, उज्ज्वल कांबळे, भाऊसाहेब गुळबिले, धनराज शिंदे, अंतराम चव्हाण, लखण आवळे, महादू राठोड, मारुती गालफाडे, सुरेखा पुरी, सुनिता माडजे, अलका कदम यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावा-गावासाठी गेल्या पाच वर्षात शासनाच्या अनेक योजना मंजूर करुन आणल्या असून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. आमदार नसतानाही दमदार कामगीरी करीत असल्याने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गादवड येथील माजी सरपंच बाबासाहेब भिसे, केशरबाई कदम, राकॉयुमोचे उपाध्यक्ष राम भताने, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, मोटेगावचे सरपंच सुभाष मुसळे, शरद पवार, बोरगाव काळे अशोक अद्माने, शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष संदिप भुजबळ अंदोरा येथील उपसरपंच बळवंत मुळे, माजी सरपंच मोहन लांडे, अय्याज शेख, शमिर पठाण, मगदुम अत्तार, महेबुब शेख, वामन लोकरे, सारसा येथील महेश पवार, नेताजी पवार, बऱ्हाणपूरचे तंटामुक्ती अध्यक्ष अनिल मोरे, माजी चेअरमन कमलाकर ताकभाते, जायफळ सरपंच खंडू बिडवे, माजी सरपंच लक्ष्मण जोगदंड, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश भोग, लखणगावचे माजी सरपंच ज्ञानोबा गोडभरले, उपसरपंच भगवान लांडगे, समदरगा व्हा.चेअरमन जग्गनाथ ढोक, चाडगावचे अभिमान माने, यशवंतवाडीचे भगवान चव्हाण, राजपाल सुर्यवंशी, काँग्रेस युवामंचचे परमेश्वर यादव, नागझरीचे उपसरपंच गफार पटेल, भिसे वाघोलीचे माजी सैनिक अनिल भिसे, सुनिल भिसे, जवळगा येथील उपसरपंच मंगलबाई वाघे, पार्वतीबाई किटेकर, ज्येती लांबुटे, तांदुळजा येथील नम्रता गायकवाड, मंगल कांबळे, वांजरखेडा पुष्पा कदम, सुमन देशमुख, दर्जीबोरगावचे ऋषीकेश कटके, महेश काळदाते, गोंदेगाव येथील हनुमंत देशमुख, कोरंगळा बळवंत माने, साधु वाघमाने, बिटरगाव येथील संदिपान पाटील, शेरा बाबु शेख, इंदरठाणा सय्यद महेमुद्दीन, भाडगाव येथील बालाजी कांबळे, इंद्रजित डोपे, जेवळी सागर दरकसे, सिध्देश्वर रणदिवे यांच्यासह अनेक गावातील ग्राप सदस्य, सोसायटीचे संचालक, गाव पातळीवारील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते अशा तब्बल ०१ हजार ५६२ कार्यकर्त्यांनी भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला. यावेळी नुतन कार्यकर्त्यांचे रमेशअप्पा कराड यांनी भाजपात स्वागत करुन पुढील पक्ष कार्यास शुभेच्छा दिल्या.
भाजपाचे सरकार खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य आहे. या राज्यात सर्व स्तरातील जनता समाधानी असल्याने आणि छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतील कारभार सुरु असल्याने छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजीराजे, उदयनराजे, शिवेंद्रराजे यासर्व राजघराण्यांनी भाजपात प्रवेश केला आहे असे सांगून माझ्यावर आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून प्रवेश केलेल्या सर्वांचा येत्या काळात सन्मान केला जाईल, कोणाचीही अपेक्षा भंग होणार नाही, काणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने, एक ताकतीने काम करुन येत्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यरत रहावे असे आवाहन रमेशअप्पा कराड यांनी केले. प्रारंभी विधानसभा प्रमुख अनिल भिसे यांनी प्रास्ताविक केले तर नव्याने भाजपात प्रवेश केलेले ज्ञानेश्वर सुर्यवंशी, अशोक अदमाने, बाबासाहेब देशमुख, शैलेश मांडे यांनी आपल्या भावना व्यक्त करुन येणाऱ्या निवडणुकीत रमेशअप्पांच्या पाठीशी भक्कम ताकद उभी करु अशी ग्वाही दिली. तर भाजपाचे रशिद पठाण, अभिजित मद्दे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी दशरथ सरवदे यांनी आभार मानले.


Comments

Top