HOME   लातूर न्यूज

अभिमन्यू पवार यांचे स्वच्छता अभियान

मुक्ती दिनाचे औचित्य, औशात नगरपालिका कर्मचार्‍यांनाही घेतले सोबत


अभिमन्यू पवार यांचे स्वच्छता अभियान

औसा: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अभिमन्यू पवार यांनी औसा खादी भांडार येथील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगरपालिका कर्मचाऱ्यांना सोबत घेवून स्वच्छता अभियान राबवले, अंतर्गत स्वच्छता केली. अभिमन्यू पवार यांनी औसा येथील खादी कार्यालयातील व्यवस्थापक रघुनाथ पोतदार यांच्याकडून कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याचबरोबर धनगर गल्ली येथील अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहासमोर नगरपालिका कर्मचाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता केली. माळी गल्ली येथील नागरिकांना आरोग्यासाठी अभिमन्यू हेल्थ केअर कार्डचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुभाष जाधव, संतोष मुक्ता, दिगंबर माळी, सुशीलदादा बाजपाई, संजय माळी, माधवसिंह परिहार, प्रा. भीमाशंकर राचट्टे, संतोष चिकुर्डेकर, सुनील उटगे, अरविंद कुलकर्णी, नारायण माळी, वसंतराव फुटाणे, मच्छिंद्र माळी, विश्वनाथ कांबळे, जितेंद्र माळी, सुधाकर माळी कमलेश पटेल आदी उपस्थित होते.


Comments

Top