HOME   लातूर न्यूज

गंजगोलाईतल्या व्यापाऱ्यांशी आ. देशमुख यांचा संवाद


गंजगोलाईतल्या व्यापाऱ्यांशी आ. देशमुख यांचा संवाद

लातूर: विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंपर्क अभियाना अंतर्गत माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी गंजगोलाई बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी संवाद साधला व लातूर बाजारपेठ उलाढाल यासह अन्य विषयावर चर्चा केली. यावेळी रवी सावळगी, अक्षय मोहिते, सैलानी शेख, गौस गोलंदाज, पंकज पाटील, रईस टाके, रफिक टाके, समधान कोंबडे, रतिराम परदेशी, मुक्तार पटेल, माणिकराव म्हेत्रे यांच्यासह भुसार लाईन, गंजगोलाई बाजारपेठेतील व्यापारी उपस्थित होते.


Comments

Top