HOME   लातूर न्यूज

महात्मा फुले भाजी मार्केट नव्याने उभारणार

अमित देशमुखांनी घेतली भाजी आडत व्यापार्‍यांची भेट, विविध विषयांवर चर्चा


महात्मा फुले भाजी मार्केट नव्याने उभारणार

लातूर: लातूरचे महात्मा फुले भाजी मार्केट नव्याने उभे करणे ही माझी जबाबदारी आहे असा शब्द आमदार अमित देशमुख यांनी दिला. महात्मा फुले भाजी मार्केट आडत व्यापारी असोसिएशनकडून आयोजित भाजीपाला मार्केट व्यापारी संवाद बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक अनुषंगाने सुरू असलेल्या जनसंपर्क अभियानाअंतर्गत लातूर शहर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अमित देशमुख यांनी भाजी मार्केट व्यापारी बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
या संवाद बैठकीत महात्मा फुले भाजी मार्केट मध्ये माल विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी भवन उभारावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये आलेला विक्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या माल ठेवण्यासाठी शीतगृह व्यवस्था या मागण्या व्यापारी बांधवांकडून करण्यात आल्या. तसेच एकदिलाने विधानसभा निवडणूक प्रचाराचे काम करून प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार महादेव भालेराव यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, या बैठकीतील आपल्या उपस्थिती मधून भरभरून प्रेम मिळाले. भाजी मार्केट मधील आपल्या मागण्या पैकी काही प्रशासकीय कारणामुळे प्रलंबित आहेत मात्र ज्या मागण्या मंजूर करता येतात त्या सर्व मागण्यांना तत्वतः मंजुरी देत असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी ललितभाई शहा, दिपक सूळ, आमिन बागवान, महादेव भालेराव, इरफान बागवान, श्रीकांत ठोंबरे, दिलीप खराडे, युवराज माळी, शहाजी ठोंबरे, शेख महेबुब, अंकुश माळी, सलीम बागवान, रब्बानी बागवान, काशिनाथ झांबरे, मुख्तार बागवान, जाकिर बागवान, बलाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे यांच्यासह महात्मा फुले भाजी मार्केट भागातील व्यापारी बांधव उपस्थित होते.


Comments

Top