HOME   लातूर न्यूज

कव्हेकर सपत्नीक भाजपात!

रात्री घेतली अमित शाहांची भेट, पालकमंत्री, लाहोटीही होते उपस्थित


कव्हेकर सपत्नीक भाजपात!

लातूर: लातूरचे माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकरांना अखेर भाजपात प्रवेश मिळाला. त्यांच्या पत्नी प्रतिभाताई, बाबासाहेब कोरे, सूर्यकांत शेळके, निळकंठ पवार अशा मोजक्या दहा-बारा जणांसोबत त्यांनी भाजपा नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि भाजपात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लातुरचे उमेदवार शैलेश लाहोटी उपस्थित होते. मुळात कव्हेकरांना भाजपची उमेदवारी हवी होती. उमेदवारीच काय त्यांना पक्षात प्रवेशही मिळाला नाही. उलट त्यांचे चिरंजीव, नगरसेवक अजित यांना भाजपाने कामाला लावले पण त्याचाही उपयोग झाला नाही. शैलेश लाहोटींनाच उमेदवारी मिळाली. राजकीय भवितव्य अबाधित ठेवण्यासाठी कव्हेकर कुटुंबियांनी हे प्रयत्न सुरु ठेवले आहेत असं लातुरचे राजकीय अभ्यासक सांगतात.


Comments

Top