HOME   लातूर न्यूज

७० वर्षात वडार समाजाचा वापर केवळ मतदानापुरता

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर: पालकमंत्री संभाजी पाटील यांची ग्वाही


७० वर्षात वडार समाजाचा वापर केवळ मतदानापुरता

निलंगा: कष्टाने दगडाला घाव घालून त्याला देवपण देणारा वडार समाज आहे. मागील ७० वर्षातील सत्ताधार्‍यांनी या समाजाचा वापर केवळ मतदानापुरताच करून त्यांना विकासाच्या परिघापासून दूर ठेवण्याचे काम केले आहे. मात्र मागच्या पाच वर्षात या समाजाच्या वेदना जाणून घेत त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महायुतीच्या सरकारने विविध योजना अंमलात आणल्या आहेत. आता या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील पाच वर्षे आम्हाला द्यावी असे आवाहन करून आम्ही समाजासाठी तत्पर राहू अशी ग्वाही पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली.
निलंगा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात मी वडार महाराष्ट्राचा वडार या संघटनेच्यावतीने समाज बांधवांच्या आयोजित मेळाव्यात पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वडार समाजाचे नेते विजयदादा चौगुले, युवानेते अरविंद पाटील निलंगेकर, मिलिंद लातूरे, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, युवानेते अश्‍वजीत गायकवाड, सभापती अजित माने, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, शंकर श्रृंगारे, चेअरमन दगडू सोळुंके, शामभाऊ जाधव, पप्पू धोत्रे, बालाजी दंडगुले, उमा तांदळे, तुकाराम चव्हाण, परमेश्वर विजापुरे, आकाश सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, गणेश धुमाळे, वसंत मुगळे, शिवाजी चौघुले उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारने विकासापासून वंचित असणार्‍या समाज घटकांसाठी ठोस पावले उचलली आहेत. केंद्रात भाजपा युतीचे सरकार असून राज्यातही भाजपा महायुतीचे सरकार आल्यावर विकासापासून वंचित असणार्‍या घटकांचा निश्‍चीतच सर्वांगीण विकास होणार आहे. याकरिता समाजबांधवांनी माझ्यासाठी एक दिवस द्यावा. तुमच्यासाठी पुढील पाच वर्ष आपल्या सेवेत तत्पर राहीन असे अभिवचन निलंगेकर यांनी याप्रसंगी दिले.


Comments

Top