HOME   लातूर न्यूज

कॉंग्रेसने देश एकसंघ ठेवला

महात्मा बसवेश्वर चौकात झाली काँग्रेस महाआघाडीची प्रचार सभा


कॉंग्रेसने देश एकसंघ ठेवला

लातूर: देशातील सर्व सामान्य जनतेचा विकास, सर्व क्षेत्रात अदभूत क्रांती आणि देशाला एक संघ ठेवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केलं असताना विद्यमान सत्ताधारी म्हणतात काँग्रेसने काय केले, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले. काँग्रेस महाआघाडीच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. लातूर शहर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूरच्या महात्मा बसवेश्वर चौक भागात काँग्रेस महाआघाडीची जाहीर प्रचार सभा पार पडली. यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जेवढ्या सभाना उपस्थिती लावली तेवढ्या सभा व आजवर लढविलेल्या ११ निवडणुकांतील सभा पाहिल्या परंतु या सभेसारखी सभा आजवर झाली नाही याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. निवडणुकीतील मिळणारी शक्ती ही मतदारांच्या आशीर्वादामुळे मिळते हे या ठिकाणी सांगणे क्रमप्राप्त ठरते. राज्यासह देशात आज जातीवाद वाढत आहे आणि विद्यमान सरकार काँग्रेस महाआघाडीने काय केले असा सवाल करते. आज भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखाने उभा आहे. देशाला एकसंघ ठेवण्यासाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी प्रयत्न केले मात्र त्यांना प्राण गमवावे लागले याची परवा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांनी केली नाही ते आजही या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
सरकारने लातूरला उजनीचे पाणी दिले नाही- अमित देशमुख
आमदार अमित देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता लातुरात चर्चा कोणाची आहे हे सिद्ध होते. लातूरचे भवितव्य घडविण्यासाठी आपण या ठिकाणी आला आहात हे मुद्दामहून सांगावे वाटते. महाराष्ट्रातील महायुती सरकारकडून हे राज्य किती वर्ष मागे गेले याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. या विद्यमान सरकारला घरचा रस्ता दाखवून राज्यात महाआघाडीचे सरकार आपल्याला आणावे लागेल असे, आवाहन आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित जनसमुदायाला यावेळी केले. यावेळी सत्तार पटेल, उदय गवारे, सुदाम रुकमे, व्यंकट बेद्रे, मोईज शेख, लक्षण कांबळे, अजगर पटेल, सिकंदर पटेल, सुंदर पाटील कव्हेकर, विद्याताई पाटील, मुष्तकिन पटेल, गोविंद घार, पूजा पंचाक्षरी, विक्रांत गोजमगुंडे, गौरव काथवटे ,शफी टाके, लक्ष्मण मोरे, मनोज शेळके, रवी बिराजदार, भरत साखरे, अमोल मुंडे, अजहर पटेल, हणमंत पिटले, बबलू पटेल, मनोज रुकमे, झुंजारे अप्पा, सुभाष पंचाक्षरी यांच्यासह काँग्रेस महा आघाडी घटक पक्षातील सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top