HOME   लातूर न्यूज

संधी द्या, तिचे सोने करीन

भाजप-शिवसेना महायुतीचे शैलेश लाहोटी यांचे आवाहन


संधी द्या, तिचे सोने करीन

लातूर: या निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आपल्याला सेवेची संधी द्यावी. आपण त्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांनी केले. निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने राम नगर-नारायण नगर भागात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समिती सभापती दीपक मठपती, गटनेते शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक सर्वश्री संगीत रंदाळे, अजित पाटील कव्हेकर, हणमंत जाकते, वर्षा कुलकर्णी, गीता गौड, शोभा पाटील, राजगिरे, शीतल मालू, शिरीष कुलकर्णी, गणेश हेड्डा, मनिष बंडेवार आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना शैलेश लाहोटी यांनी लातूरकरांचे हक्काचे मांजरा धरणातील पाणी आपले साखर कारखाने जगवण्यासाठी चोरणाऱ्या आमदारांना पुन्हा जवळ करणार का? असा सवाल करून लातूरचा हा दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित असल्याचे सांगितले. सुजाण मतदारांनी आता आपण कोणाच्या पाठीशी उभे राहायचे, विकास करणाऱ्याच्या की दुष्काळ आणणाऱ्याच्या, याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पर्यटन म्हणून लातूरला येणाऱ्या आमदाराला मतदान करण्यापूर्वी विचार करा, असे सांगून शैलेश लाहोटी यांनी मतदारांनी आपल्या सुख-दुःखात धावून येणारा प्रतिनिधी म्हणून आपणास एक वेळ संधी द्यावी, आपण त्या संधीचे निश्चित सोने करू असे आवाहन केले. यावेळी त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचाही माहिती दिली.


Comments

Top