HOME   लातूर न्यूज

सरकारने अंबानी, अदानींच्या सोयीचे निर्णय घेतले

विवेकानंद चौकातील सभेत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा आरोप


सरकारने अंबानी, अदानींच्या सोयीचे निर्णय घेतले

लातूर: देशातील आणि महाराष्ट्रातील सरकारांनी कायम अदानी, अंबानीसारख्या बड्या उद्योगपतींच्या सोयीचे निर्णय घेतले़ या सरकारांना शेतकरी, शेतमजूर, दलित, अल्पसंख्यांक, ओबीसी, भटके-विमुक्त, आदीवासी यांचे दुखणे कळलेच नाही़ त्यामुळे जनसामान्यांनी आता या सरकारला हद्दपार करण्यासाठी काँग्रेस महाआघाडीला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन दिलीपराव देशमुख यांनी केले़. काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं (गवई), रिपाइं (कवाडे), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ विवेकानंद चौकात ०३, ०४ व ०७ या प्रभागांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते़. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य अब्दुल अली अजिजी यांची प्रमुख उपस्थिती होती़.
यासभेत एस़आऱ देशमुख, रिपाइंचे एऩडी़ सोनकांबळे, शेकापचे ॲड़ उदय गवारे, रघूनाथ बनसोडे, केशव कांबळे, दिलीप गायकवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले़. या सभेस जिल्हा बँकेचे व्हाइर्स चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, नगरसेवक विजयकुमार साबदे, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, अहेमदखा पठाण, कैलास कांबळे, रुबिना तांबोळी, सोजर मदने, दीप्ती खंडागळे, वर्षा मस्के, महेश काळे प्रा़ अनंत लांडगे, एम़एच़ शेख, ॲड़ फारुक शेख, रफिक सय्यद, आयोध्याबाई उपाध्याय, बिरबल देवकते, चव्हाण, राम स्वामी, किशोर कांबळे, अशोक सूर्यवंशी, हरिभाऊ गायकवाड, भीमराव साळवे, विनोद शिंदे, भारत नरके यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते़ प्रास्तविक ॲड़ अंगद सूर्यवंशी यांनी केले तर सुत्रसंचालन जीवन सुरवसे यांनी केले़.
दलित, अल्पसंख्यांक, ओबीसींच्या भावनांशी खेळ- अब्दुल अली अजिजी
देशातील भाजपा-शिवसेनेवर टीका करताना अब्दुल अली अजिजी म्हणाले की, काँग्रेसने डॉ़ आंबेडकरांच्या संविधानाला शिर्षस्थानी ठेवले ते संविधान बदलण्याची भाषा विद्यमान सत्ताधारी करीत आहेत़ काश्मिर भारताचा होता, आहे आणि राहिल त्यासाठी देशाचे जवान आहोरात्र सीमांवर लक्ष ठेवून आहेत़ परंतू काश्मिरचा प्रपोगंडा करुन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत़. सिमांचे रक्षण जवान करीत असताना ते आम्हीच करीत आहोत, असे भासवून जवानांचा एक प्रकारे अवमान करण्याचीच कृती मोदी आणि अमित शहा यांच्याकडून होत आहे़. दलित, अल्पसंख्यांक, ओबीसींच्या भावनांशी खेळ मांडला जात आहे़. गांधींच्या मारेकऱ्याला हिरो ठरवले जात आहे़. मोदी गांधींच्या विरोधात तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस पवारांच्या विरोधात गरळ ओकत असताना जनसामान्यांच्या प्रश्नाबद्दल मात्र चकार शब्दही काढत नाहीत़ सिर्फ वोट की बात करते है, गरीबोंके पेट की बात भाजपा-शिवसेनकडून होत नाही़. काँग्रेस मात्र गरीबांच्या भाकरीचे बोलतो, नोकरीचे बोलतो, सुशिक्षितांच्या हाताला काम मिळावे म्हणून बोलतो़. त्यामुळे मतदारांनी काँग्रेस आणि भाजपातील फरक ओळखावा व आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या काँग्रेस पक्षाला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन अब्दूल अली अजिजी यांनी केले़.


Comments

Top