HOME   लातूर न्यूज

धनशक्तीला जनशक्ती दाखवा!

लातुरच्या गावभागात वंचितचे उमेदवार राजा मनियार यांचे अवाहन


धनशक्तीला जनशक्ती दाखवा!

लातुर: धनशक्तीला जनशक्तीचा इंगा दाखवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजा मनियार केले. जुन्या लातुरातील पटेल चौक येथे आयोजित सभेत ते बोलत होते. पुढे बोलतांना राजा मनियार म्हणाले पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे. पण प्रस्थापित व सत्ताधारी हे आरोप प्रात्यारोप करून लातुरकरांची दिशाभूल करीत आहेत. स्वाभिमान जिवंत ठेवा मी नोकर आहे. मालक नाही. मी सामान्य आहे. कधीही आवाज द्या मी तुमच्या विश्वासाला पात्र ठरेन. यासाठी हा लढा मी तुमच्यासाठी लढतोय. या लढ्यात वंचितांना अधिकार मिळवून देण्यासाठी तुमच्या समोर मतदान मागण्यासाठी आलो आहे. तुम्हीच माझी शक्ती आहात. धनशक्तीला जनशक्ती दाखवा. या सभेत अ‍ॅड गोपाळ बुरबुरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर अँड. मोहम्मद अली, इस्माईल फुलारी, सत्तारभाई, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Comments

Top