HOME   लातूर न्यूज

मुख्यमंत्र्यांचा अभ्यास, सामान्यांची वाट!

गंगापुरात महाआघाडीच्या प्रचार सभेला जोरदार प्रतिसाद


मुख्यमंत्र्यांचा अभ्यास, सामान्यांची वाट!

लातूर: विद्यमान सरकारकडे कुठलाही सर्वसामान्य जनतेचा प्रश्न नेल्यास आभ्यास करू हे त्यांचे नेहमीचे उत्तर म्हणजे विद्यामन सरकारचे काम मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करायचा आणि जनतेने केवळ वाट पाहत राहायची असे मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले. गंगापूर येथे आयोजित महाआघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
महाराष्ट्र विधानसभा २०१९ अनुषंगाने मागील काही दिवसांपासून सुरू असलेला निवडणूक प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ गंगापूर या ठिकाणी प्रचार सभा पार पडली. यावेळी बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, गंगापूरवासियानी नेहमी साथ दिली आणि आदरणीय विलासराव यांच्या लाडक्या गावापैकी असणारे राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक असणारे गाव म्हणजे गंगापूर आहे. सन १९८० पासून आदरणीय विलासराव देशमुख यांच्या विचाराला मानणारे आदर्श गाव अशी ओळख गंगापूरची आहे. काँग्रेसने गंगापूरला लोकसभेची उमेदवारी देण्याचे काम केले पण पराजय झाला. निवडणुकीत जय पराजय हा होत असतो या गोष्टीचं वाईट वाटून घेण्याची गरज नाही. आपलं आजवरचं नात यापुढे देखील असच जोपासण्याची गरज आहे. आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत ते या महाराष्ट्रात कोणाचं सरकार द्यायचे आहे यावर निर्णय घेण्यासाठी.
यावेळी बोलताना उल्हास दादा पवार म्हणाले की, एका बाजूला विद्यमान सरकार च्या काळात शेतकऱ्याच्या सर्वाधिक आत्महत्या होत असताना दुसरीकडे देशाचे पंतप्रधान असताना मनमोहन सिंह यांनी ७० हजार कोटींचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते हे विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा शेती क्षेत्र व शेकर्‍यांसाठी सोनेरी दिवस आणायचे असतील तर राज्यात काँग्रेस महा आघाडीचे सरकार आणावे असे आवाहन त्यांनी केले.


Comments

Top