HOME   लातूर न्यूज

अमित देशमुख यांची वकील मंडळास भेट

जनसंपर्क अभियानांतर्गत वकील मंडळींशी साधला संवाद


अमित देशमुख यांची वकील मंडळास भेट

लातूर: शहर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आ. अमित देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेल्या जनसंपर्क अभियानांतर्गत लातूर जिल्हा वकील मंडळास सदिच्छा भेट देऊन वकील मंडळींशी संवाद साधाला. देशमुख यांनी यावेळी महिला विधिज्ञांचीही भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने लातूर शहर विधानसभेचे ऊमेदवार म्हणुन मतदान देण्याचे आवाहन केले. यावेळी लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत आगरकर, ॲड. सचिन पंचाक्षरी, ॲड. प्रतिक कुलकर्णी, ॲड. किरण जाधव, ॲड. दत्तात्रय पांचाळ, ॲड. अजितकुमार चिखलीकर, ॲड. छाया अकाते, ॲड. गणेश गोजमगुंडे, ॲड. संतोष देशपांडे, ॲड. हृदयनाथ डांगे, ॲड. जिलानी शेख, ॲड. किशन शिंदे, ॲड. वैभव बिराजदार, ॲड. रोहित सोमवंशी, ॲड. योगेश कुलकर्णी यांच्यासह जिल्हा वकील मंडळाचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य, अन्य विधीज्ञ यांची भेट घेऊन संवाद साधला. देशमुख यांनी यावेळी ॲड. महेश शिंदे यांच्या कार्यालयासही भेट दिली.
यावेळी ॲड. व्यंकट बेद्रे, ॲड. किशोर राजुरे, ॲड. उदय गवारे, ॲड. राजेश खटके, ॲड. देवीदास बोरुळे पाटील, ॲड. प्रदिप पाटील, ॲड. प्रदिप गगणे, ॲड. अस्लम शेख, ॲड. इरफान शेख, ॲड. दीपक बोरगावकर, ॲङ. सज्जाद शेख, ॲड. दौलत दाताळ उपस्थित होते.


Comments

Top