HOME   लातूर न्यूज

फक्त देशमुख बंधू लखोपती!

बाकी विजयी लाखाच्या खाली, वाचा उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते


फक्त देशमुख बंधू लखोपती!

लातूर: लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात आघाडीचे उमेदवार जिंकले. दोन ठिकाणी भाजपाला पुन्हा संधी मिळाली. या सहा मतदारसंघांपैकी अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे दोघेजणच एक लाखाचा आकडा पार करु शकले. विधानसभा मतदारसंघनिहाय विजयी उमेदवारांची नावे व उमेदवारांना मिळालेली मते यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
234- लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार श्री. धीरज विलासराव देशमुख हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री. सचिन उर्फ रवि रामराजे देशमुख यांच्यापेक्षा 1 लाख 21 हजार 482 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघात उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.
अर्जून धोंडिराम वाघमारे (महाराष्ट्र नव निर्माण सेना) 2 हजार 912 मते, खंडेराव लिंबाजी भोजराज (बहुजन समाज पार्टी) 813 मते, धीरज विलासराव देशमुख (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 1 लाख 35 हजार 06 मते, सचिन ऊर्फ रवी रामराजे देशमुख (शिवसेना) 13 हजार 524 मते, जलील यासीन अत्तार (बहुजन मुक्ती पार्टी) 662 मते, डोणे मंचकराव बळीराम (वंचित बुहजन आघाडी) 12 हजार 966 मते, दगडुसाहेब व्यंकटराव पडीले (लोकराज्य पार्टी) 494 मते, बालाजी हणमंत गोडसे (राष्ट्रीय मराठा पार्टी) 898 मते, शंकर गणपत सोनवणे (बहुजन विकास आघाडी) 313 मते, अरविंद महादेव गाडे (अपक्ष) 492 मते, एकुर्के बाजीराव दत्तात्रय (अपक्ष) 547 मते, गडगले राजकुमार मारोती (अपक्ष) 383 मते, बब्रुवान बळीराम पवार (अपक्ष) 1496 मते, श्रीनिवास अंगदराव अकनगिरे (अपक्ष) 576 मते, सचिन माधव पाणढवळे (अपक्ष) 1017 मते आणि नोटाला 27 हजार 500 मते मिळाली आहेत.
235-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार श्री. अमित विलासराव देशमुख हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. शैलेश गोविंदकुमार लाहोटी यांच्यापेक्षा 40 हजार 321 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघात उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.
अमित विलासराव देशमुख (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस) 1 लाख 9 हजार 548 मते, कांबळे मधुकर संभाजी (बहुजन समाज पार्टी) 739 मते, शैलेश गोविंदकूमार लाहोटी (भारतीय जनता पार्टी) 69 हजार 227 मते, अखीक रहेमान अ.जलील मोमीन (इंडियान युनियन मुस्लिम लिग) 497 मते, जयराज सुर्यंकांत सह्याद्री (राष्ट्रीय मराठा पार्टी) 146 मते, बंडुसिंग गुलाबसिंग भट (बहुजन मुक्ती पार्टी) 151 मते, राजासाब बाशुमियाँ मणियार (वंचित बहुजन आघाडी) 24 हजार 298 मते, राम शंकर पाटोळे (बहुजन विकास आघाडी) 254 मते, आल्टे विश्वनाथ महादेव (अपक्ष) 87 मते, छोटु किशनराव हिबारे (अपक्ष) 116 मते, व्दारकाधिश ऊर्फ दिनेश गोविंद पारीख (अपक्ष) 158 मते, पठाण मिनहाज खान असिफ खाँ (अपक्ष) 83 मते, फिरोज खान साजिद खान पठाण (अपक्ष) 127 मते, बाबासाहेब गोरोबा सितापूरे (अपक्ष) 175 मते, मनोजकुमार उर्फ दिनेश जुगलकिशोर गिल्डा (अपक्ष) 485 मते, विकास जीवन सूर्यवंशी (अपक्ष) 497 मते, लातूरश्री विठ्ठल उर्फ शशिपंकज (अपक्ष) 655 मते, श्रीराम किसनराव गोमारे (अपक्ष) 92 मते, संतोष संभाजी साबदे (अपक्ष) 257 मते, नोटाला 710 मते मिळाली आहेत. (235-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या माहितीचा वरील उमेदवाराला मिळालेल्या मतांमध्ये अद्याप समावेश करण्यात आलेला नाही.)
236-अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. बाबासाहेब मोहनराव पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. जाधव पाटील विनायकराव किशनराव यांच्यापेक्षा 29 हजार 191 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघात उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.
जाधव पाटील विनायकराव किशनराव (भारतीय जनता पार्टी) 55 हजार 445 मते, ॲड. तिगोटे बालाजी संभाजी (बहुजन समाज पार्टी) 621 मते, बाबासाहेब मोहनराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) 84 हजार 636 मते, अयोध्या अशोक केंद्रे (वंचित बहुजन आघाडी) 22 हजार 141 मते, ताहेर हुसेन मैनोद्दीन सय्यद (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन) 1 हजार 996 मते, ॲड. रियाझ अहेमद निसार अहेमद सिध्दिकी (इंडियन युनियन मुस्लिम लीग) 973 मते, चंद्रकांत साहेबराव जाधव (अपक्ष) 806 मते, दिलीप राजेसाहेब देशमुख (अपक्ष) 45 हजार 846 मते, ज्ञानोबा सोपान जरीपटके (अपक्ष) 755 मते, नोटा-1 हजार 762 मते मिळाले आहेत.
237-उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. संजय बाबूराव बनसोडे हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. अनिल सदाशिव कांबळे यांच्यापेक्षा 20 हजार 579 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघात उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.
अनिल सदाशिव कांबळे (भारतीय जनता पार्टी) 75 हजार 787 मते, काशिनाथ गुनाजी काळे (बहुजन समाज पार्टी) 963 मते, संजय बाबुराव बनसोडे (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी) 96 हजार 366 मते, अतुल अभिमन्यू धावारे (वंचित बहुजन आघाडी) 2 हजार 599 मते, बालाजी केशव कांबळे (बहुजन मुक्ती पार्टी) 417 मते, संजय सोपानराव कांबळे (बहुजन विकास आघाडी) 496 मते, कमलाकर प्रभाकर कांबळे (अपक्ष) 223 मते, धोंडीबा इरबा नामवाड (अपक्ष) 310 मते, नरसिंग पांडुरंग घोणे (अपक्ष) 456 मते, प्रदीप प्रल्हाद कांबळे (अपक्ष) 318 मते, बालाजी हिरामन गडकर (अपक्ष) 281 मते, शोभा सुशिल मोतीराम (अपक्ष) 349 मते आणि नोटा- 1 हजार 97 मते मिळालेली आहेत.
238- निलंगा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यापेक्षा 32 हजार 131 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघात उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.
अशोकराव शिवाजीराव पाटील (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस) 65 हजार 193 मते, राजाराम विठ्ठल कांबळे (बहुजन समाज पार्टी) 907 मते, संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर (भारतीय जनता पार्टी) 97 हजार 324 मते, अरविंद विरभद्रप्पा भातांब्रे (वंचित बहुजन आघाडी) 29 हजार 819 मते, अंकुशराव शिवाजीराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी) 478 मते, रामेश्वर बाबुराव सूर्यवंशी (बहुजन विकास आघाडी) 249 मते, अन्वरखाँ सत्तारखाँ पठाण (अपक्ष) 438 मते, शेषेराव रामा कांबळे (अपक्ष) 345 मते, श्रीमंत निवांत उसनाळे (अपक्ष) 641 मते, राजकुमार विठ्ठल सस्तापूरे (अपक्ष) 652 मते आणि नोटाला 1 हजार 272 मते मिळाली आहेत.
239- औसा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. अभिमन्यू दत्तात्रय पवार हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. बसवराज माधवराव पाटील यांच्यापेक्षा 25 हजार 647 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघात उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.
प्रा. डॉ. अनिल सुग्रीव कांबळे (बहुजन समाज पार्टी) 760 मते, अभिमन्यू दत्तात्रय पवार (भारतीय जनता पार्टी) 92 हजार 731 मते, बसवराज माधवराव पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 67 हजार 84 मते, अभिमन्यू शेषराव पवार (संभाजी ब्रिगेड पार्टी) 1 हजार 75 मते, सुधीर शंकरराव पोतदार(वंचित बहुजन आघाडी) 8 हजार 49 मते, आकाश प्रकाश पाटील (अपक्ष) 279 मते, गौसुदीन उस्मान शेख (अपक्ष) 164 मते, नितीन पंडितराव बंडगर (अपक्ष) 210 मते, पांडुरंग मुरलीधर चेवले (अपक्ष) 215 मते, बंजरंग भुजंगराव जाधव (अपक्ष) 9 हजार 431 मते, बसवराज पाटील (अपक्ष) 398 मते, बसवराज पाटील (अपक्ष) 269 मते, मनोहर आनंदराव पाटील (अपक्ष) 797 मते, रामकिशन ऊर्फ बालाजी मनोहर जाधव 494 मते आणि नोटाला 764 मते मिळाली आहेत.


Comments

Top