HOME   लातूर न्यूज

लातुरकरांना पाणी द्या, दिवाळी गोड करा

नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांची मनपा आयुक्तांकडे मागणी


लातुरकरांना पाणी द्या, दिवाळी गोड करा

लातूर: लातूर शहरात उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे शहरास दर १५ दिवसांनी एक वेळा नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला होता. परंतु मागील काही दिवसात धनेगाव धरण आणि अनेक बॅरेजेसच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने चांगला पाणी साठा झाला आहे. धरण पात्रात अजूनही पाण्याची आवक सुरु आहे. व्यवस्थित नियोजन केल्यास लातूर शहरास वर्षभर पुरेल इतके पाणी आज रोजी जमा झालेले आहे. भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व असणाऱ्या दिवाळी सणाला नुकतीच सुरुवात झाली असून यानिमित्त शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करून लातूरकरांची दिवाळी गोड करावी अशी मागणी मनपा स्थायी समिती माजी सभापती तथा नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे केली. दुष्काळ काळात लातूरकरांनी सहनशीलता दाखवत मनपास सर्वतोपरी सहकार्य केले. आता पाण्याची मुबलक उपलब्धता असताना लातूरकरांना पाणी पुरवठा करून लातूर मनपाने देखील आपले कर्तव्य बजावावे अशीही विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.


Comments

Top