HOME   लातूर न्यूज

आ. अमित देशमुख लातुरात

अनेक शिष्टमंडळे भेटली, उद्या घेणार दिवसभर अनेकांच्या गाठीभेटी


आ. अमित देशमुख लातुरात

लातूर: आ. अमित देशमुख लातुरात आले आहेत. त्यांनी आपला चेहरा पूर्वीपेक्षा बदलला आहे. उद्या सकाळी ९.३० ते १२.३० या काळात दिवाळी पाडवानिमित्त बाभळगाव येथे जनतेच्या भेटी घेतील. दुपारी १२.३० ते ४.३० वाजता दिवाळी पाडवा निमित्त राखीव, सायंकाळी ७.३० वाजता दिवाळी पाडवा निमित्त डालडा फॅक्टरी कंपाउंड जवळील बसवराज वळसंगे यांच्या भाग्यश्री ट्रेडिंग कंपनी दुकानास भेट देतील. तसेच २९ व ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते १२.३० वाजता दिवाळी निमित्त बाभळगाव येथे जनतेच्या भेटीगाठी घेतील.
विविध शिष्टमंडळांनी घेतली भेट
माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांची आज लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील विविध भागातल्या शिष्टमंडळांनी बाभळगाव निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य घेऊन तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेलेल्या आमदार अमित देशमुख यांना त्यांच्या विजयाबद्दल उपस्थित नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. महाराणा प्रतापनगर येथील शिष्टमंडळाने बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन आमदार अमित विलासराव देशमुख यांचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच शरद शिंदे, सुभाष जाधव, शिवाजी सावंत, गुंडेराव पाटील, भरत सुर्यवंशी, दगडू पठाण, खुदबोद्दिन पठाण, वाजीद शेख, यासर सय्यद यांच्यासह महाराणा प्रताप नगर भागातील नागरिक उपस्थित होते.दरम्यान महाराणा प्रताप नगर च्या नागरिकांना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिवाळी निमीत्त शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी झोन प्रमुख समद पटेल, नगरसेवक सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, शैलेश बोईनवाड, विजयकुमार साबदे, दगडू अप्पा मिटकरी, राजू गवळी, सूरज राजे, ज्ञानेश्वर सागावे, रफिक सय्यद, सत्यवान कांबळे, मुनवर शेख, प्रकाश बनसोडे, समीर शेख, युसुफ सय्यद, श्याम अंकुशे, बळी सरवदे, देविदास बोरुळे, अजित कवठेकर, प्रदीप बेंबडे, डॉ.नजीर शेख, सय्यद सादिक, नवाब शेख, मनदीप सवाई, काशिनाथ वाघमारे, बबलू शेख, केशव गिरी, मोसिन शेख, लालासाहेब मोरे, बंडू बारसकर, गौस शेख, जाकिर शेख, काशिनाथ अप्पा शेटे, शिवशंकर मंटुरे यांच्यासह प्रभाग २, ३ व ८ मधील पक्ष पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top