HOME   लातूर न्यूज

शेती नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात करा

सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहीजे- जिल्हाधिकारी जी. श्रीकांत


शेती नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात करा

लातूर: जिल्हयात अवेळी पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने शेती पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. जिल्हयातील सुमारे ९७ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. त्यामुळे अवेळी पावसाने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु झालेले आहेत. पिकांच्या नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे पुढील दोन दिवसातपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पिक नुसानीचे पंचनामे बाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते.यावेळी मनपा आयुक्त एमडी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गवसाने, जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक संतोष भोसले, कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा ) बाळासाहेब शेलार, जिल्हा उपनिबंधक सामृत जाधव, जिल्हा नियेाजन अधिकारी दुशिंग, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, अवेळी पासाने जिल्हयातील सुमारे ९० टक्के पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी विहित पध्दतीने पीक नुकसानीचे पंचनामे पुढील दोन दिवसात शंभर टक्के पूर्ण केले पाहिजेत. या करीता उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक काम करुन पीक नुकसानीच्या पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.


Comments

Top