HOME   लातूर न्यूज

मुरूम नको, खड्डे 'कोल्ड मिक्स'ने बुजवा

पालकमंत्री संभाजी पाटील यांची पालिका आयुक्तांना सूचना


मुरूम नको, खड्डे 'कोल्ड मिक्स'ने बुजवा

लातूर : आता पाऊस जवळपास थांबलेला आहे. त्यामुळे खड्ड्यात मुरूम टाकणे थांबवावे आणि लातूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे 'कोल्ड मिक्स' पद्धतीने दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय थांबवावी, अशा सूचना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी महापालिकेचे आयुक्त एमडी सिंग यांना फोनवरून दिल्या. पावसामुळे शहरातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना वाहतुकी दरम्यान अडचणी येत असून त्या संदर्भातील तक्रारी प्राप्त होत आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मुरूम टाकून हे खड्डे बुजविले जात आहेत. मुरूम टाकून खड्डे बुजविले तरी काही दिवसात परिस्थिती जैसे थे होते. खड्ड्यातील मुरूम निघून जाऊन पुन्हा खड्डे तयार होतात. त्यामुळे मुरमाऐवजी कोल्डमिक्स टाकून हे खड्डे बुजवावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. कोल्डमिक्सने खड्डे बुजवले तर वारंवार दुरुस्ती करावी लागणार नाही. याशिवाय पुन्हा लवकर खड्डे पडणार नाहीत. पर्यायाने नागरिकांचा त्रास कमी होऊन तक्रारीही येणार नाहीत. शिवाय सध्या पाऊसही थांबला आहे. त्यामुळे यापुढे कोल्डमिक्सनेच खड्डे बुजवावेत. मुरुमाचा वापर करू नये अही सूचना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी महापालिका आयुक्त एमडी सिंह यांनी केली आहे. त्यामुळे नजीकच्या काही दिवसात कोल्डमिक्सने शहरातील खड्डे बुजवले जाणार असून नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.


Comments

Top