HOME   लातूर न्यूज

जागृती साखर कारखान्याचे बॉयलर पेटले

ऊस उत्पादक व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले पूजन


जागृती साखर कारखान्याचे बॉयलर पेटले

लातूर: लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज चा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा शेतकरी ऊस उत्पादक धोंडीराम कारभारी व मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाइस चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे, मारूती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, संचालक दिलीप माने, सूर्यकांत करवा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी माजी चेअरमन एस आर देशमुख, यशवंतराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सर्जेराव मोरे, संभाजी रेड्डी, भगवानराव पाटील विजयनगरकर, व्यंकट बिरादार, हरिराम कुलकर्णी, दिलीप पाटील, गोविंदराव भोपणीकर, मांजरा साखर कारखाण्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रनवरे, रेणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भीमराव मोरे, विलास साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बारबोले, राम भंडारे, सतीश पाटील, बालाजी बोबडे, धनराज चिद्रे, जागृती शुगरचे प्रकल्प व्यवस्थापक सुनीलकुमार देशमुख, अधिकारी, कर्मचारी, उस उत्पादक शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.


Comments

Top