HOME   लातूर न्यूज

भाजपाचे बंडखोर नगरसेवक निलंबित

चंद्रकांत बिराजदार आणि गिता गौड यांच्यावर भाजपाने केली कारवाई


भाजपाचे बंडखोर नगरसेवक निलंबित

लातूर: महापौर निवडणूकीत पक्षाच्या धोरणाविरोधात काम करत बंडखोरी करणारे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड यांना भाजपातून निलंबित करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, संघटन सरचिटणीस गुरुनाथ मगे व मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे यांनी बंडखोरांना निलंबित केल्याची घोषणा केली. २२ नोव्हेंबर रोजी लातूर महापालिकेच्या महापौर निवडीदरम्यान पक्षाने अधिकृत उमेदवार दिले होते. परंतू निवडीदरम्यान भाजपा नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात काम केले. भाजपा ऐवजी विरोधी पक्षाला मदत केली. ही कृती पक्षविरोधी असल्याने त्या दोघांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपा हा विचार मानणारा पक्ष आहे. या विचारांना विरोध दर्शवल्यामुळेच त्या दोघांनाही निलंबित करण्यात आले असल्याचे लाहोटी, मगे व गोजमगुंडे यांनी सांगितले.


Comments

Top