HOME   लातूर न्यूज

चित्रपटाचे रसग्रहण करायला शिकले पाहिजे

ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांचे लातूर चित्रपट महोत्सवात आवाहन


चित्रपटाचे रसग्रहण करायला शिकले पाहिजे

लातूर: 'जन्मताच जसे प्रत्येकाला लिहिता वाचता येत नाही'. त्यासाठी शिकावे लागते तसेच चित्रपट वाचायला, रसग्रहण करायला आणि आकलन शिकले पाहिजे' असे मत ज्येष्ठ कलावंत व निर्माते डॉ. मोहन आगाशे यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. सोसायटी फॉर वेल बियेंग अर्वे अर अँड रिहाबिलीस्टेशन ‘स्वर’, अंतरंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र आणि अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लातुरात दोन दिवसंच्या चित्रपट महोत्सवाचे डॉ. आगाशे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमास मंचावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. अशोक आरदवाड, अभिजात फिल्म सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, डॉ. संजय कुर्वीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सजग कलावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. मोहन आगाशे यांनी लातूरकर प्रेक्षकांचे मुक्त संवाद साधला आणि चित्रपटाविषयीची उत्तरेही दिली. चित्रपट निर्मितीबद्दल आणि प्रेक्षकाच्या अभिरुची बद्दल बोलताना डॉ. आगाशे म्हणाले की, ‘चित्रपट हे आरोग्य प्रवर्तक असतात’, हवं तर त्यांना चवणप्राश माना. प्रेक्षकांनी चित्रपट बघायला शिकले पाहिजे. भारतीय चित्रपटाला वेगळी परंपरा आहे. या चित्रपटातील अनेक प्रसंग, कथानक, दृश्य, संगीत, अभिनय आदी गोष्टीपासून आपण काय होतो यावर सगळे अवलंबून असते. मन हे संगीतासार खे असते वाद्य मोडत असते परंतु मन हे कधी मोडत नसते. जस आपण कोणते पुस्तक वाचावं वाचून हे ठरवतो तसं कोणता चित्रपट पाहावा पाहू नये हे आपण ठरवतो. त्याच प्रमाणे अनेक चित्रपटातून आपल्याला शिकण्यासारखे अनेक गोष्टी असतात ज्या चित्रपट विचार प्रवृत्त करीत नाही तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनात चिरकाल वास्तव करू शकत नाही.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना डॉ. मिलिंद पोतदार व त्यांच्या टीमने आपला व्यवसाय सांभाळून नेटके चित्रपट महोत्सवाचे आयोजन करून समाजाला सजग करण्याचे काम केले अशा विविध पैलूवर प्रकाश टाकलेला असतो. माणसाच्या काय भावना असतात हे दाखवण्याचा निर्माता-दिग्दर्शक प्रयत्न करीत असतो. शरीराचा आजार कमी करणे खूप सोपे असते पण मनाचा आजार कमी करणं खूप अवघड असते. कसं जगल पाहिजे याचा अनुभव आपल्याला चित्रपटातून येत असतो असेही त्यांनी स्पष्ट केले. या महोत्सवाचे संयोजक डॉ. मिलिंद पोतदार यांनी चित्रपट महोत्सव आयोजना मागची भूमिका विशद केली. संस्थेच्या सचिव मुग्धा पोतदार यांनी प्रास्ताविकात 'स्वर' संस्थेची माहिती दिली. जितेंद्र पाटील यांनी अभिजात फिल्म सोसायटी राबवीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. श्याम जैन, समीर मणियार, नीलिमा कुलकर्णी, प्रा.ज्ञानेश्वर चौधरी आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. संतोष कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. मोहन आगाशे निर्मित 'कासव' हा चित्रपट दाखविण्यात आला.


Comments

Top