HOME   लातूर न्यूज

डॉ. प्रियंकासाठी लातुरात मूक मोर्चा

मारेकर्‍यांना कठोर शिक्षा करा, डॉ. आंबेडकर लॉयर्स लिगची मागणी


डॉ. प्रियंकासाठी लातुरात मूक मोर्चा

लातूर: हैद्राबादेत डॉ. प्रियंका रेड्डीवर अमानुष अत्याचार झाला. बलात्कार आणि हत्या या प्रकारामुळे सबंध समाजमन ढवळून निघाले. प्रियंकाला न्याय मिळावा आणि गुन्हेगारांना कठोर शासन मिळावे यासाठी आज लातुरात मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चाने शिवाजी चौकात श्रध्दांजली अर्पण केली.
कायद्याचा वचक निर्माण करा
आपल्या वैद्यकीय ज्ञानाने अनेकांचा तारणहार ठरलेल्या हैद्राबादेतील डॉ. प्रियांका रेड्डी यांच्या मारेकर्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा करुन कायद्याचा वचक निर्माण करावा, अशी मागणी लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लिगच्या वतीने राज्य शासनाकडे जिल्हाधिकार्‍यांमार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर अ‍ॅड. आशिया मगर, अ‍ॅड. स्वाती बोरा, अ‍ॅड. छाया आकाते, अ‍ॅड. गायत्री नल्ले, अ‍ॅड. प्रतिभा कुलकर्णी, अ‍ॅड. सुरेखा श्रंगारे, अ‍ॅड. मनिषा होनकर, अ‍ॅड. के.के.शेख, अ‍ॅड. एनडी वायकोळे, अ‍ॅड. एआर वाघमारे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लिगचे अ‍ॅड. राजेंद्र लातूरकर, अ‍ॅड. शिवकुमार बनसोडे, अ‍ॅड. सुधीर शिंदे, अ‍ॅड. सुरेंद्र सूर्यवंशी, अ‍ॅड. श्रीनिवास गुप्ते, अ‍ॅड. एसएन आंबेकर आदींची नावे व स्वाक्षर्‍या आहेत.


Comments

Top