HOME   लातूर न्यूज

डॉ. बाबासाहेबांच्या चैत्यस्मारकाचा उर्वरित निधी द्या

आ. धीरज विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


डॉ. बाबासाहेबांच्या चैत्यस्मारकाचा उर्वरित निधी द्या

लातूर: रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य चैत्य स्मारक उभारले जात आहे. यासाठी माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर करण्यात आला होता. या मंजूर निधीपैकी राहिलेला ७० लाखांचा निधी मिळावा अशी मागणी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. बोधीसत्व डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पानगाव येथे जतन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागपूरनंतर पानगाव हे अनुयायांचे मोठे प्रेरणास्थान आहे. मराठवाड्याचे भूषण असलेल्या या स्थळाला महाराष्ट्रच नव्हे तर शेजारील आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून अनुयायी भेट देत असतात. या प्रेरणास्थळाला माजी राज्यमंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांच्या सहकार्याने व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला. २०१२ मध्ये अमित देशमुख यांनी चैत्य स्मारकाच्या उभारणीसाठी शासनाकडून ४७२.४४ लाख रुपये मंजूर करुन घेतले. या निधीपैकी ४०२.४४4 लाख रुपयांचा निधी चैत्यस्मारकाच्या बांधकामासाठी मिळाला. शासनाची प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या रकमेपैकी उर्वरित ७० लाख रुपयांचा निधी शासनाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत त्वरित उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आ. धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


Comments

Top