HOME   लातूर न्यूज

अमित देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपद

कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडी कार्यकर्त्यांकडून जिल्हाभरात जल्लोष


अमित देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपद

लातूर: राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या राज्यमंत्री मंत्रीमंडळाचा पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात सलग तीनवेळा प्रचंड मताधिक्क्याने विजयी झालेले लातूर शहर विधानसभा मतदार संघातील आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्या नंतर लगेचच लातूर शहरासह जिल्हाभरातील कॉंग्रेस महाआघाडी कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्याकडून लातुरात गुलाल उधळून, ठिकठीकाणी पेढा भरवून मतदारांचे तोंड गोड करण्यात आले.
लातूर शहरातील विवेकानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजर्षी शाहू महाराज चौक, गंजगोलाई, कॉंग्रेस भवन, महात्मा गांधी चौक, आदर्श कॉलनी गेट, एम.आय.डी.सी.१ नंबर चौक, बाभळगाव, जुना रेणापूर नाका, गावभाग यासह अनेक ठिकाणी कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडी कार्यकर्त्यांनी, विविध भागातील उदयोजक, व्यवसायीक, शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फटाके फोडत, मिठाई वाटत जल्लोष साजरा केला.
यावेळी राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, बबन भोसले, अभिजीत देशमुख, किशोर कदम, काँग्रेस काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप, अॅड. प्रदीपसिंह गंगणे, शिवाजी कांबळे, शिवसेनेचे तानाजी करपुरे, काँग्रेसचे प्रा.शशिकांत देशमुख, अॅड.बाळासाहेब शिंदे, इस्माईल सय्यद, प्रवीण सावंत, अविनाश बटेवार, नामदेव सुबनवाड, आशिष सूर्यवंशी, वैभव डोळे, रोहित पाटील, दिपक गायकवाड, नीलेश सोनी, शिवसेनेचे त्रयंबक स्वामी, योगेश पाटील, मारुती सावंत, संतोष माने, आकाश मसाने, तर राष्ट्रवादीचे मुक्ती फयाज अली, रेखा कदम, टिल्लू शेख, जहांगीर शेख, मुन्ना तळेकर, विषाल विहिरे, जफर खान, रामभाऊ रायवाड, नामदेव जाधव, बाळासाहेब जाधव, अविनाश पाटील, गोविंद पवार, युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोहम्मद खान, शाहबाज खान, अरफात पटेल, मोसिन शेख, आदिल शेख, राजु गवळी, सुनील वाळे, सलमान भाई, इम्तियाज शेख, श्रीकांत खोजे, सोहेल पटेल, आदिल ईनामदार, चंद्रमुनी कांबळे आदी उपस्थित होते.


Comments

Top