HOME   लातूर न्यूज

ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना?

अतुल देऊळगावकरांच्या पुस्तकाचे उद्या पुण्यात प्रकाशन


ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना?

लातूर: आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ तथा ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगांवकर लिखित 'ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ लेखिका विणा गवाणकर यांच्या हस्ते शनिवार ०४ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी सहा वाजता एसएम जोशी सभागृह, पत्रकार भवनाजवळ, गांजवे चौक, पुणे या ठिकाणी होणार आहे. छोट्या मुलीच्या मोठ्या लढ्याची गोष्ट सांगणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास सर्व ग्रंथ प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनोविकास प्रकाशनच्या वतीने अरविंद पाटकर, आशिष पाटकर यांनी केले आहे.


Comments

Top