HOME   लातूर न्यूज

लातूर शहरातील पथदिवे पुन्हा उजळले

महापौर, उपमहापौरांनी मानले महावितरणचे आभार, दोन आठवड्यात भरणार बील


लातूर शहरातील पथदिवे पुन्हा उजळले

लातूर: शहर महानगरपालिकेने जून २९१८ पासून वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे विजबिलाची चालू थकबाकी ०४ कोटीच्या घरात पोहचली परिणामतः महावितरण कंपनीकडून शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला होता. यामुळे लातूर शहर अंधकारमय होऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये नुकतेच काही दिवसांपूर्वी सत्तांतर होऊन नूतन महापौर व उपमहापौर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून शहरात विकासात्मक कामे करण्यासह मनपाची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना कर्मचाऱ्यांचे वेतन देखील काही महिन्यांपासून रखडले आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेची कडून वीज बिलाचा भरणा सुरळीत होत नव्हता. परंतु डिसेंबर महिन्यामध्ये एकूण ३८ लक्ष रुपयाचा विद्युत बील भरणा करण्यात आला असला तरीही चालू थकबाकी पूर्णपणे भरणे महानगरपालिकेला शक्य होत नव्हते. याबाबत मागील दोन दिवसापासून शहराचे महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार महावितरणच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून यामधून मार्ग काढण्याचा काढण्याचा प्रयत्न करीत होते. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनीही महावितरण कंपनीकडे याबाबत पाठपुरवठा केला. राज्याचे नूतन मंत्री अमित देशमुख यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महावितरण कंपनीचे मुख्य व्यवस्थापकिय संचालक यांच्याशी चर्चा करून महानगरपालिकेस दोन आठवड्याचा वाढीव कालावधी देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे महावितरण कंपनीने लातूर शहरातील पथदिव्यांच्या जोडण्या पुर्ववत केल्या असून यामुळे लातूर शहर पुन्हा एकदा उजळून निघाले आहे. महानगरपालिकेला मिळालेला हा दिलासा तात्पुरता असून येत्या दोन आठवड्यांमध्ये महानगरपालिकेला वीज बिलाचा भरणा करावा लागणार आहे. लातूर शहराबाबत सहानुभुतीने निर्णय घेतल्याबद्दल महावितरणचा कंपनीच्या अधिकाऱ्यांचे महापौर व उपमहापौर यांनी आभार व्यक्त केले.


Comments

Top