• 20 of March 2018, at 1.19 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

मुख्य बस स्थानक बंद, दुसरे चालू, अवजड वाहनांना प्रवेश नाही

मुख्य बस स्थानक बंद, दुसरे चालू, अवजड वाहनांना प्रवेश नाही

लातूर: आज शिवजयंतीनिमित्त शहरभरातून निघणार्‍या मिरवणुका, शोभायात्रा, विविध उपक्रम लक्षात घेता शहरात येणार्‍या बसेसचे प्रमाण कमी केले जात आहे. यासाठी शहरातील मुख्य आणि जुने बसस्थानक बंद ठेवण्यात आले आहे. अंबाजोगाई मार्गावर झालेले नवे बसस्थानक उपयोगात आणले जात आहे. खाजगी प्रवासी वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली असून पाच नंबर चौक, नवा रेणापूर नाका, विवेकानंद चौक आणि राजव गांधी चौकातच ही वाहने थांबवली जात आहेत. सवयीने जुन्या बसस्थानकात येणार्‍यांची माहिती अभावी अडचण होत असून त्या सर्वांना नव्या बस स्थानकाकडे जाण्यास सांगितले जात आहे.


Comments

Top