• 20 of March 2018, at 1.21 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

इंडीया अश्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात दोन लाखांची चोरी

इंडीया अश्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात दोन लाखांची चोरी

लातूर: अत्यंत वर्दळीच्या, शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यालगत असलेल्या अश्श्युरन्स कंपनीच्या शाखेत चोरी झाली आहे. आज सकाळी कार्यालय उघडण्याच्या वेळी ही बाब लक्षात आली. शाहू महाविद्यालयाजवळ जुन्या बसवेश्वर मंगल कार्यालयासमोर ही न्यू इंडीया अश्श्युरन्स कंपनीची शाखा आहे. सलग तीन दिवसांच्या सुट्या आल्याने या कार्यालयाकडे कुणी फिरकल्र नसणार. त्याचाच डाव साधून ही चोरी झाली असावी. तिजोरीचे कुलूप रितसर उघडून चोराने हा कार्यक्रम केला. तिजोरीच्या दोन चाव्या जबाबदार व्यक्तींकडे असताना ही तिसरी चावी आली कुठून असा प्रश्न असल्याचे जबाबदार पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. या चोरीचा तपास करण्यासाठी तज्ञ श्वानही पाचारण करण्यात आले पण ते शाहु महाविद्यालयाच्या पुढे जाऊ शकले नाही असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चोरीची पद्धत, चावी, तीन दिवसांच्या सुट्या या सगळ्या गोष्टी लक्षात घेता, माहितगारानेच हा प्रताप केला असावा असे बोलले जात आहे. कार्यालयात प्रवेश करताच डाव्या बाजुला असलेल्या टेबलावरील भला मोठा कागदांचा ढीग इकडे तिकडे पडलेला दिसत होता.


Comments

Top