HOME   लातूर न्यूज

ऊसाचं टिपरुही शिल्लक राहणार नाही, आ. देशमुखांची ग्वाही


ऊसाचं टिपरुही शिल्लक राहणार नाही, आ. देशमुखांची ग्वाही

लातूर: लातूर जिल्ह्यात ऊसाचे एक टिपरुही गाळपाशिवाय शिल्लक राहणार नाही, अशी व्यवस्था आगामी काळात उभारली जाईल, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिली. शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे यांच्या आग्रहाखातर औसा तालुक्यातील त्यांच्या कवळी गावास आमदार अमित देशमुख यांनी भेट दिली त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्ह्याध्यक्ष अॅड.व्यंकट बेद्रे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे, जि.प.सदस्य धनंजय देशमुख, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडुसाहेब पडीले, कृउबा उपसभापती मनोज पाटील, विलास कारखान्याचे व्हा.चेअरमन गोविंद बोराडे, प्रविण घोटाळे, मांजराचे संचालक प्रवीण पाटील, स्वंयप्रभा पाटील, अविनाश देशमुख, सुपर्ण जगताप आदी उपस्थित होते.
या प्रसंगी पुढे बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे व त्यांचे सर्व सहकारी येथे एकत्र झाले आहेत. सर्व कार्यकर्त्यांचा संघर्ष सर्वसामान्य माणसांसाठी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ते सातत्याने मांडत आहेत. त्यांचे कार्य लक्षात घेऊनच आज मी येथे आलो आहे. भविष्यातही मोरे आणि त्यांचे सहकारी जे प्रश्न आमच्याकडे घेवून येतील ते सोडविण्यासाठी मी कटीबध्द राहणार आहे. यावर्षी या भागातील कारखाने बंद असल्यामुळे ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगामी वर्षात मात्र जिल्ह्यातील सर्व ऊस गाळप होईल याचे नियोजन करुन त्या दृष्टीने आंमलबजावणी केली जाणार आहे. ऊसाचे एक टिपरुही शिल्लक राहणार नाही याची काळजी आम्ही भविष्यात घेणार आहोत. या कार्यक्रमाप्रसंगी कवळी गावचे सरपंच राजेंद्र मोरे, माजी सरपंच सिध्दे•ार जगताप, सत्यभामा मोरे, दयानंद करांडे, नारायण जगताप, सोपान भिसे, हरिदास रामपुरे, वसंतराव पाटील, आनंद केणी, भिसे गुरुजी आदींसह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


Comments

Top