HOME   लातूर न्यूज

ग्राहकाची फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करावी

- अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक


ग्राहकाची फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करावी

लातूर: वस्तू विक्रीदाराकडून ग्राहकाची फसवणूक झाल्यास ग्राहकाने कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता जिल्हा तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल करावी प्रशासकीय यंत्रणा आपल्या
पाठीशी आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित जागतिक ग्राहकदिनाच्या
कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव, तहसिलदार संजय वरकड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अध्यक्ष राजेद्र वानखेडे उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाठक म्हणाले की, वस्तू खरेदी करणारा हा ग्राहक आहे, वस्तू पुरवठा करणाऱ्यांनी ग्राहकास कायदया बरोबरच नैतिक जबाबदारीने वस्तू पुरवठा केला पाहिजे ग्राहकानी वस्तू चांगली वाजवून घ्यावी. वस्तू परिमाण व्यवस्थीत नसल्यास ग्राहकाना दाद मागण्याचा अधिकार आहे.जिल्हयातील प्रत्येक नागरिकांनी जागृत राहुन वस्तू खरेदी करावी असे आवाहनही त्यांनी केले. या जागतिक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा ग्राहक संरक्षक परिषदेचे अशासकीय सदस्य राजेश भोसले, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष राजेद्र वानखेडे, ग्राहक कल्याण समितीचे सल्लागार संपद झळके यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून दीपप्रज्वलन करण्यात आले.जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव यांनी जागतिक ग्राहकदिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून ग्राहकाना आपल्या हक्काची जाणीव करून दिली.
कार्यक्रमास प्रशासनातील अधिकारी / कर्मचारी, नागरिक पुरवठा तपासणी अधिकारी शिवाजी पालेवाड,ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष जगदीश भराडीया, जिल्हा ग्राहक संरक्षक परिषदेवरील अशासकीय सदस्य सतीश देशमुख, सिद्यकी ए. आर, मानधना शामसुदंर सह जिल्हाभरातील ग्राहक महिला पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश सरोदे यांनी केले तर तहसिलदार संजय वरकड यांनी आभार मानले.


Comments

Top