• 19 of April 2018, at 5.17 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
news image सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 news image हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर news image अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 news image लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 news image ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501

HOME   लातूर न्यूज

नागरीकांना घर बसल्‍या बांधकाम परवाना मिळावा

अॅटो डि. सी. आर लागू करा, पर्वाने मिळतील आर्थिक सुधारणाही होईल- विक्रांत गोजमगुंडे

नागरीकांना घर बसल्‍या बांधकाम परवाना मिळावा

लातूर: शहर महानगरपालिकेद्वारे बांधकाम परवाना वितरीत करण्‍यात होणारा विलंब पाहता नागरीकांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागते. नगर रचना विभागातील अपु-या कर्मचारी व अधिका-यांमुळे परवाने प्रलंबीत राहत आहेत. नाईलाजाने नागरीक अनाधिकृत बांधकामांकडे वळत आहेत तसेच बांधकाम परवाना शुल्‍कामधून मनपास प्राप्‍त होणारे उत्‍पन्‍न ही बुडत आहे. नागरीकांनी दाखल केलेल्‍या कागदपञांची योग्‍य प्रकारे छाननी करने हे प्रत्‍येक वेळी शक्‍य होत नाही त्‍यातून काही विवादीत व चूकीचे परवाने सुद्धा दिले जाण्‍याचे प्रकार समोर येतात तसेच बांधकाम शुल्‍काची योग्‍य आकारणी न झाल्‍यामुळे याचा फटका मनपा व सामान्‍य नागरीक यांना बसतो. अनेक नागरीक शुल्‍क भरणा करण्‍यास तयार असूनही केवळ कागदोपञी प्रक्रिया वेळेवर होत नसल्‍याने नागरीकांमध्‍ये शेष निर्माण होत आहे. यामुळे लातूर मनपाच्‍या वतीने अॅटो डी.सी.आर प्रणाली (सुलभ बांधकाम परवाना प्रणाली) सुरू करण्‍यात यावी अशी मागणी माजी स्‍थायी समिती सभापती तथा नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी मनपा आयुक्‍तांकडे केली आहे. यामुळे नगररचना विभागाच्‍या कामाच्‍या पारदर्शक्‍ता येवून गतिमानतही येवू शकते. अॅटो डि सी.आर प्रणाली लागू केल्‍यानंतर नागरीकांना मनपामध्‍ये यायची आवश्‍यकताच भासणार याउलट घरबसल्‍या त्‍यांना बांधकाम परवाना करीता अर्ज दाखल करता येईल तसेच परवाना फाईल नेमकी कुठे अडली आहे. अथवा कोणत्‍या स्‍तरावर आहे याची माहीतीही मिळु शकेल. एवढेच नाही तर परवाना मधील ञुटी नागरीकांना घरबसल्‍या पाहता येतील व कागदपञांची पुर्तता करून शुल्‍कही ई पेमेंटच्‍या माध्‍यमातून करता येईल. यामुळे मनपाचा कारभार गतीमान होवून नागरीकांची मोठी सोय होवु शकते त्‍यामुळे नागरीकांना घरबसल्‍या बांधकाम परवाना मिळावा यासाठी अॅटो डि.सी.आर प्रणाली लागु करण्‍याची मागणी मनपा आयुक्‍त यांच्‍याकडे करण्‍यात आली आहे. मनपा आयुक्‍तांनीही यावर सकारात्‍मक पावले उचलली जातील याबाबत आश्‍वस्‍त केल्‍याचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगीतले.


Comments

Top