HOME   लातूर न्यूज

स्वच्छ सुंदर प्रभाग ११ साठी नगरसेवक गवळींचे अनेक उपक्रम


स्वच्छ सुंदर प्रभाग ११ साठी नगरसेवक गवळींचे अनेक उपक्रम

लातूरः स्वच्छ लातूर.. सुंदर लातूर... मोहीमेंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक ११ नेही स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. नगरसेवक शिवकुमार गवळी यांच्या पुढाकारातून प्रभागातील नागरिक स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले आहेत. गवळी यांनी प्रभागासाठी विविध योजना राबविल्या असून यामुळे प्रभाग स्वच्छ व सुंदर होण्यास मदत झाली आहे. स्वच्छतेच्या कामी नगरसेवक गवळी यांनी सक्रीय सहभाग नोंदवला आहे. नागरिकांनीही गवळी यांच्या प्रयत्नांना उत्तम साथ दिली आहे. प्रारंभी शासकीय कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षापासून घाणीच्या विळख्यात अडकलेली ही कॉलनी स्वच्छ झाली. प्रभागामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. दैनंदिन कचरा संकलन केले जाऊ लागले. घंटागाडीचे वेळापत्रक प्रभागातील नागरिकांना समजावून सांगण्यात आले. यासोबतच ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत माहिती देऊन त्या पद्धतीने संकलन करण्यात आले.
स्वच्छतेची भावना प्रत्येकाकडेच असते. ती अधिक वाढावी यासाठी नगरसेवक शिवकुमार गवळी यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप केले. स्वच्छ प्रभाग.. स्वच्छ लातूर असे घोषवाक्य लिहीलेले टी शर्ट प्रभागात वाटप करण्यात आले. यासोबतच धूर फवारणी करून घेण्यात आली. स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली. जनजागृतीसाठी प्रभागात १६ कार्यक्रम घेण्यात आले. श्रमदानातून स्वच्छता मोहीमेचे नऊ कार्यक्रम झाले. प्रभागात जमा करण्यात आलेल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला. शिवाय प्रभागात शंभर टक्के शौचालयाचे बांधकामही करून देण्यात आले. या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक ११ मधील स्वच्छतेची चळवळ गतीमान झाली आहे.


Comments

Top