HOME   लातूर न्यूज

मनपाच्या शाळा क्रमांक नऊला १५ लाखांचे विज्ञान केंद्र मंजूर

मुंबई-ठाण्यानंतर महाराष्‍ट्रातील एकमेव शाळा, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्‍या प्रयत्‍नांना यश


मनपाच्या शाळा क्रमांक नऊला १५ लाखांचे विज्ञान केंद्र मंजूर

लातूर: उपक्रमशील नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्‍या प्रयत्‍नातून लातूर शहर महानगरपालिकेच्‍या मंठाळेनगर येथील मनपा शाळा क्रमांक नऊ या शाळेस महाराष्‍ट्र शासनाचे नाविन्‍यपूर्ण विज्ञान केंद्र मंजूर झाले आहे. मुंबई, ठाणेनंतर महाराष्‍ट्रातील मनपाची ही एकमेव शाळा ठरली आहे. या योजनेअंतर्गत मनपा शाळेस १५ लाखांचे विज्ञान साहित्‍य प्राप्‍त झाले आहे. यामधून मंठाळेनगर येथील मनपा शाळेमध्‍ये अदयावत विज्ञानकेंद्र उभारण्‍यात आले आहे. एलसीडीसह आधुनिक विज्ञान प्रयोगांचा यात समावेश आहे. अशा प्रकारचे विज्ञान केंद्र हे सभोवतालच्‍या परिसरात एकमेव असून याचा लाभ मनपा शाळेसह इतर खाजगी शाळांमधील विदया‍र्थ्‍यांना होणार आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या शिक्षण विभागाच्‍या वतीने नाविन्‍यपूर्ण विज्ञान केंद्र योजनेअंतर्गत महाराष्‍ट्रातील ५०० स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांची निवड करण्‍यात येणार होती. यासाठी प्रभागाचे नगरसेवक व स्‍थायी समितीचे माजी सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रस्‍ताव तयार करून घेवून शासन स्‍तरावर पाठपूरावा केला होता. याकरिता प्रा. अजय महाजन, अमोल गोवंडे व मनपा शाळेचे मुख्‍याध्‍यापक शिवदास शिंदे यांनी विशेष सहाय्य केले. यापूर्वीही विक्रांत गोजमगुंडे यांच्‍या प्रयत्‍नांतून मनपा शाळेस आयएसओ मानांकन प्राप्‍त झाले आहे.


Comments

Top