logo
news image मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, बॅकलॉगही भरणार- मुख्यमंत्री news image त्रिपुरा महाविद्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारणार्‍या अकरावीची विद्यार्थिनीचा मत्यू news image दूध आंदोलनाबाबतची बोलणी फिस्कटली, आज स्वाभिमानीचे रास्ता रोको news image दूध आंदोलनात मनसेचीही उडी, गुजरातहून येणार्‍या गाड्या अडवल्या news image मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करणार- मराठा आंदोलकांचा इशारा news image उजनीच्या पाणी पातळीत वाढ news image नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो news image धुळे जिल्ह्यातील महत्वाच्या तीन महत्वाच्या धरणात शून्य टक्के पाणी news image पंतप्रधानांवर अविश्वास ठराव, उद्या येणार चर्चेला news image जळगावच्या केळी शीतगृहात स्फोट news image प्रियंका चोप्रा येणार वेब सिरिजमध्ये news image महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून एक लाख १५ हजार कोटी रुपयांचा निधी

HOME   टॉप स्टोरी

कुठे आहे इंद्रप्रस्थ? या पाण्याचं काय करायचं?

शहरातील अनेक ठिकाणचं पाणी जातं वाया, मुरवायला कुणीच तयार नाही!

लातूर: जलयुक्त शिवार योजनेने मोठी कामगिरी बजावली. त्यानंतर लातुरच्या पालकमंत्र्यांनी ज्लयुक्त आवार योजना शोधली. शहरात पडणारं पाणी शहरातच मुरवायचं असा उदात्त हेतू या योजनेमागे होता. घराच्या छतावर पडणारं पाणी शोषखड्डा किंवा बोअर पुनर्भरणाच्या माध्यमातून जमीनीत जिरवायचं असा सदहेतू या मागे होता. यासाठी त्यांनी मेळावे घेतले, प्रचार फेर्‍या काढल्या. किती लोकांनी या मोहिमेत सहभाग घेतला हे अजून तरी कळाले नाही. पण शहरातील अनेक मोकळ्या मैदानावर पडलेल्या खड्ड्यातून प्रचंड पाणी साठलेले असते. हे पाणी बाष्पीभवन होऊन निघून जाते. त्याचा लातुरकरांना उपयोग होत नाही. उदाहरणच सांगायचे झाल्यास टाऊन हॉलच्या मैदानाचा विचार करता येईल. या मैदानावर तुडुंब पाणी साचलेले असते. तेही असेच वाया जाते. या मैदानाचा उतार काढून एखाद्या शोषखड्ड्यात ते जिरवले गेल्यास बाजुची डीसीसी बॅंक, महापालिका, गुगळे हॉस्पिटल, आंबेडकर पार्क यांना नक्कीच फायदा झाला असता. योजना केवळ आदर्श असून चालत नाही तर त्यातल्या प्रत्यक्ष अडचणी आणि उणिवांचाही विचार केला गेला पाहिजे. नुसते मंत्री असून चालत नाही!


Comments

Top