logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   टॉप स्टोरी

सरकारी दवाखान्यातील कर्मचार्‍याच्या नातवावर कुत्र्यांचा हल्ला

अनेक ठिकाणी जखमा,डुकरांचाही हैदोस, घाणीचे साम्राज्य, प्रशासनाला दिसेना!

लातूर: तीन वर्षाच्या मुलाचा चार कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना सरकारी रुग्णलयाच्या परिसरात घडली आहे. गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लातूर सर्वोपचार रुग्नालयात वास्तव्यास असलेल्या समर्थ महादेव देवके नामक मुलाव्र चार कुत्र्यांनी हल्ला केला. त्याच्या शरिरावर डोळ्यापाऊन पायापर्यंत अनेक ठिकाणी चावे घेतले. समर्थ हा त्याच्या नातेवाईकासोबत मिरवणूक पाहण्यासाठी त्याच्या आजोबाच्या घरातून बाहेर पडला असता त्याच्या अंगावर सर्वोपचार परिसरातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात समर्थ जबर जखमी झाला आहे. त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता तेथे लस उपलब्ध नसल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात करण्यात आले होते. समर्थचे आजोबा चंद्रकांत बेकरे हे शासकीय रुग्नालयात वॉर्डबॉय म्हणून कार्यरत आहेत. आजोबा सोबत कॉर्टरमध्ये समर्थ राहतो. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा आणि डुकरांचा रुग्णास आणि त्यांच्या नातेवाईकास सतत धोका जाणवतो. प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नसल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरती प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. शिवाय डेंग्यूही वाढत आहे त्यावरही इलज करावा अशी विनंती पक्षी-प्राणी मित्र प्रशांत जोजारे यांनी केली आहे.


Comments

Top