HOME   टॉप स्टोरी

२०१९ मध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार- उद्धव ठाकरे

शिवसेना स्वबळावर आगामी निवडणूका लढविणार


लातूर: राज्यात १८० तालुक्यात दुष्काळसद्रुष्य परस्थिती आहे या भागाचा दौरा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लातुरमध्ये आले होते. मराठवाड्यात दुष्काळाची तिव्रता जास्त आहे त्यामुळे राज्यसरकारने तात्काळ दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी ठाकरे यांनी केली. निवडणूकांच्या वेळी भाजपाने जनतेची फक्त दिशाभुलच केली आहे. आजपर्यंत दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत यामुळे आगामी काळात भाजपाला मतरुपी भिक घालू नका असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. विधानसभाच नाही तर लोकसभेवरही भगवा फडकवला जाणार असून आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवाय, राज्यात दुष्काळजन्य स्थिती असतानाही राज्याचे मुख्यमंत्री हातात पंचांग घेऊन दुष्काळ जाहीर करण्याचा मुहूर्त शोधत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.दरम्यान आज शहरात बुथप्रमुखांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते. भाजपने युतीबाबत अल्टीमेट दिल्यांनतरही त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावरच असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. आज लातूरमध्ये बुथप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान शिवसैनिकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करीत त्यांनी भाजपवरही सडकून टिका केली. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका रात्रीत नोटाबंदी करताना सर्वसामान्यांचा विचार न करणारे हे भाजप सरकार आता दुष्काळ जाहीर करण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांचा अहवाल घेत आहे. त्यामुळे वेळीच दुष्काळाबाबत निर्णय न घेतल्यास शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. दुसरीकडे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका समोर ठेऊन त्यांनी भाजपने दिलेली आश्वासने पाळली आहेत की नाही ? योजनांचा लाभ प्रत्यक्षात सर्वसामान्यांना मिळाला आहे की नाही ? याची चाचपणी करुन सत्य बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. मराठवाड्यात ४६ विधानसभा मतदार संघ असून प्रत्येक ठिकाणच्या बुथप्रमुखांचा संपर्क हा थेट मतदारांशी असणे आवश्यक आहे. बुथप्रमुखच हा आपल्या पाठीचा कणा असून त्यावरच स्थानिक पातळीवरील समीकरणे अवलंबून असतात. यावेळी मंचावर मिलींद नार्वेकर, खा. रवींद्र गायकवाड, खा, चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, अभय साळुंके, सुनिता चाळक, शोभा बेंजरगे, माजी आमदार दिनकर माने उपस्थित होते


Comments

Top