HOME   टॉप स्टोरी

नंदिनी, अंजली गायकवाडच्या सुरांनी केलं मंत्रमुग्ध

अष्टविनायकच्या कार्यक्रमात दोघी भगिनींनी केली अवीट सुरांची बरसात


लातूर: करमणुकीच्या क्षेत्रात टीव्ही आणि इंटरनेटवर काय मिळत नाही? सगळं मिळतं. पण अलिकडे कला क्षेत्रातील कुठल्याही लाईव्ह कार्यक्रमाला चांगली गर्दी होऊ लागली आहे. त्यात सारेगमपच्या चॅंपियन नंदिनी आणि अंजली गायकवाड यांचा लाईव्ह असेल तर विचारुच नका. आज अष्टविनायक प्रतिष्ठाननं या दोघींना निमंत्रित केलं होतं. नंदिनी आणि अंजली या भगिनींनी अनेक गाजलेली नवी-जुनी गाणी सादर केली. अखेरपर्यंत प्रेक्षकांनी जागा सोडली नाही. या दोघींनी गायलेली अनेक गाणी अतिशय जुनी होती. प्रेक्षकातील अनेक तरुणांना-तरुणींना ती माहितही नसतील पण नंदिनी-अंजलीच्या सादरीकरणामुळे सगळेचजण अवाक होऊन ती गाणी कानात साठवून घेत होते. याच कार्यक्रमात लातुरचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनीही दोन गाणी सादर केली. नंदिनी आणि अंजली या दोघींकडे सध्या सबंध संगीत क्षेत्राचे लक्ष लागले आहे. त्यांना आता सबंध देशातील रसिक ओळखू लागले आहेत. या कार्यक्रमाला नंदिनी आणि अंजलीचे आईवडील, प्रदीप राठी, आ. बसवराज पाटील, महापौर सुरेश पवार उपस्थित होते.


Comments

Top