HOME   टॉप स्टोरी

मनपाच्या दारात कर्मचार्‍य़ांचं उपोषण

न्यायालयाच्या निर्णयाची अमलबजावणी नाही, मनपा कर्मचारीविरोधी!


लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्व कामगार कर्मचारी यांना शासन निर्णयाप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा आणि ४०८ कर्मचार्‍यांना आकृतीबंधानुसार सेवेत कायमस्वरुपी रुजू करुन घ्यावे या मागणीसाठी यासाठी मनपाच्या प्रवेशद्वारालगत एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अमलबाजावी करावी आणि ८३ कर्मचारी यांना कायमस्वरुपी कामावर घेण्यात यावे आणि त्यांचे वेतन सुरळीत चालू करावे. लातूर मनपा ही कर्मचार्‍यांच्या कायम विरोधात आहे त्यामुळे हे उपोषण करण्यात येत आहे असे मराठवाडा विभागीय नगर परिषद कर्मचारी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष शिवमुर्ती पवार यांनी सांगितले. यावेळी मनपाचे सर्व कर्मचारी या उपोषणात सहभागी झाले आहेत. या मागण्यांचे विवेदन आयुक्तांना देण्यात आले. यावेळी संभाजी देवकुळे, उत्तम कुलकर्णी, भागवत चक्रे, चंद्रकला मस्के, माधव गायकवाड, विठ्ठ्ल कांबळे, विनायक कांबळे यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.


Comments

Top