HOME   टॉप स्टोरी

कॉंग्रेस करतंय भाजपजनांची दिशाभूल

विधानसभा निवडणुकात देऊ उत्तर- संभाजी पाटील निलंगेकर


लातूर: लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजताच देशात सर्वत्र आरोप प्रत्यारोपांची सुरवात झाली. यामध्ये लातूर लोकसभा कशी मागे राहिल! कार्यकर्ता मेळाव्यात आ. अमित देशमुख यांनी पालकमंत्री संभाजी पाटील यांच्यावरती काही आरोप केले मग त्यांना उत्तर देताना संभाजी पाटलांनी चांगलेच खडे बोल सुनावले. कॉंग्रेस सध्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करीत आहे. खा. सुनील गायकवाड हे भाजपाच्या प्रचाराच्या दरम्यान कुठे दिसले नाहीत म्हणून निलंगेकरांना विचारले असता त्यांनी कॉंग्रेसकडे कुठलाच मुद्दा नसल्याने ते या मुद्दाचं राजकारण करत आहेत असे उत्तर दिले.


Comments

Top