logo

HOME   टॉप स्टोरी

लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता.....

मराठवाड्यास ५० टीएमसी पाणी देणार- मुख्यमंत्री फडणवीस

मुरुड: भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुरुड येथे आले होते. आपले मतदान हे राष्ट्रहितासाठी करा आणि मोदींना साथ द्या असे आवाहहन मुख्यमंत्र्यांनी केले. कॉग्रेसच्या उमेदवाराची अनामत जप्त होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना सरकारने थेट मदत केली. शेतकऱ्यांना पेन्शन देणारा आपला पहिला देश असणार आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. काँग्रेसचा बालेकिल्ला लातूर हा इतिहास होता. आता संपूर्ण जिल्हा भाजपमय असून भविष्यातही येथे वर्चस्व कायम ठेवून काँग्रेस उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली पाहिजे, अशी स्थिती निर्माण करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केले. सर्वसामान्य जनतेलाही माहिती झाले आहे की, देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. त्यानुसारच मतदानाला सामोरे जा, असे सांगत आमदार अमित देशमुख यांच्यावरही त्यांनी टीका केली. लातूर ग्रामीण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा मुरुड येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मुखमंत्र्यांनी टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम झाला आहे. त्यांच्या आजीपासून ते आता स्वतः देखील गरिबी हटावची घोषणा करत आहेत. याची त्यांना लाज कशी वाटत नाही? हे ७२ हजार देऊ म्हणत आहेत, पण यांच्याकडे कसल्याही प्रकारचे नियोजन नाही. त्यामुळे त्यांची ही योजना फसवी असल्याची टीका फडणवीस यांनी केली.


Comments

Top