HOME   टॉप स्टोरी

बापू आणि नारायण साईंविरुद्ध राजकीय षडयंत्र

लातुरचे साधक संतप्त, महिलांबाबतच्या कायद्यांचा गैरवापर केल्याचा आरोप


लातूर: मागच्या अनेक वर्षांपासून आसाराम बापू कारागृहात आहेत. त्यांचे चिरंजीव नारायण साई यांना अलिकडेच शिक्षा झाली. लोकसभेच्या निवडणुकांचा विचार करुन ही शिक्षा झाली. साईंविरुद्धचा गुन्हा तेरा वर्षांपूर्वीचा आहे त्याचा निकाल आता लागतो. पण सरन्यायाधीश मात्र लगेच कसे काय मुक्त होतात असा सवाल साधकांनी केला. लातुरचे हे हे सर्व प्रमुख साधक आज आजलातूरच्या कार्यालयात आले. त्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. यात निखिल गिरी, बाळासाहेब भसुरे, अ‍ॅड पीएस तिवारी, अ‍ॅड वसंतराव पौळ, कैलाससिंह यादव, मनिषा शेटे, वेदवती गिरी, निर्मला दंडबोले यांचा समावेश होता.
(संपर्क: निखिल गिरी 8830957989)


Comments

Top