HOME   टॉप स्टोरी

मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदी दिपक मठपती

दोघा उमेदवारांना पडली समान मते, चिठ्ठीद्वारे निवड


लातूर: लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाचे दीपक मठपती यांची निवड झाली. या पदासाठी कॉंग्रेसकडून रवीशंकर जाधव उभे होते. तर भाजपाने दीपक मठपती यांना उमेदवारी दिली होती. तर रवीशंकर जाधव यांना उमेदवारी दिली होती. प्रत्यक्ष मतदानात जाधव आणि मठपती यांनी सारखीच आठ-आठ मते पडली. निर्वाचन अधिकारी, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी चिठ्ठ्या टाकून निवड करण्याचे घोषित केले. त्यानुसार लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यात दीपक मठपती यांना लॉटरी लागली. त्यांना सभापती म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी महापौर, उपमहापौर, तसेच स्थायी समितीचे सर्व सदस्य, माजी सभापती शैलेश गोजमगुंडे आणि अन्य सदस्य उपस्थित होते. आगामी काळात शहरातील ज्वलंत पाण्याच्या प्रश्नासह अन्य स्मस्या सोडवण्यावर लक्ष देऊ असे मठपती यांनी सांगितले.


Comments

Top